आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सविस्तर:मुंबई, पुण्यासह औरंगाबादेत निर्बंध आणखी कठोर होणार; ग्रीन झोनमधील जिल्ह्यांना मिळणार दिलासा

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राज्यात एकाच दिवसात 352 नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 2,334

केंद्राने कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार राज्याचे तीन झोन तयार करण्याच्या सूचना केल्यानंतर आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून माहिती गोळा केली अाहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांची रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये विभागणी केली आहे.  सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबई, पुणे व औरंगाबादचा रेड झोनमध्ये समावेश हाेणार आहे. एकही कोरोनाग्रस्त नसलेले ९ जिल्हे ग्रीन झोनमध्ये असतील. या जिल्ह्यांनी वेळीच जिल्हाबंदी केल्याने अद्याप एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाढत असलेली रुग्णसंख्या पाहून लॉकडाऊनची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवली आहे. गेल्या ३ आठवड्यांपासून बंदिस्त असलेल्या नागरिकांना काही सोयी उपलब्ध करून देण्याचा विचारही राज्य सरकार करीत आहे. यासाठीच सोमवारी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्हीसीद्वारे चर्चा केली.

हे आहेत झोनचे निकष  

ज्या जिल्ह्यांत १५ पेक्षा अधिक रुग्ण आहेत त्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला अाहे, तर ज्या जिल्ह्यात १५ पेक्षा कमी रुग्ण आहेत त्यांचा ऑरेंज झोनमध्ये आणि ज्या जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त नाही त्यांचा ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

ऑरेंज झोनमधील जिल्हे आठवडाभरात ग्रीन झोनमध्ये आणणार

  • ऑरेंज झोनमध्ये गेलेले राज्यातील जिल्हे आता एका अाठवड्यातच ग्रीन झोनमध्ये आणण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
  • याशिवाय रेड झोनमध्ये असलेले कोरोनाग्रस्त जिल्हे ३० एप्रिलपूर्वी ऑरेंजमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
  • यासाठी राज्य सरकार रेड झोनमधील जिल्ह्यांमधील नागरिकांवर कठोर निर्बंध घालणार आहे. त्यांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

एकाच दिवसात ३५२ नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या २,३३४

मुंबई : सोमवारी राज्यात ३५२ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांचा आकडा २,३३४ वर पोहोचला आहे. सोमवारी ११ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी मुंबईत ९ आणि पुणे, मीरा-भाईंदर येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात मृतांचा आकडा १६० वर गेला असून यात मुंबईतील मृत्यूंची संख्या ११० आहे. कोरोनाबाधित २०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी मृतांमध्ये ४ पुरुष आणि ७ महिलांचा समावेश आहे. यात मुंबईचे ९ व पिंपरी -चिंचवड तसेच मीरा-भाईंदरचा प्रत्येकी १ रुग्ण आहे. अाजवरच्या ४३,१९९ नमुन्यांपैकी ३९,०८९ जणांचे नमुने निगेटिव्ह आले. मरकजमध्ये सहभागी ७५५ पैकी ५० जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

राज्यातील रुग्णांचा तपशील

मुंबई  १५४०, ठाणे ५९, नवी मुंबई ४६, कल्याण डोंबिवली ५०, उल्हासनगर १, मीरा-भाईंदर ४९, पालघर ४, वसई विरार २६, रायगड ५, पनवेल ९, नाशिक मंडळ ६४, पुणे मंडळ ३१५, कोल्हापूर मंडळ ३८, औरंगाबाद मंडळ २५, लातूर मंडळ १३, अकोला मंडळ ४०, नागपूर मंडळ ४० इतर राज्ये ९.

बातम्या आणखी आहेत...