आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नव्या वादात शिवसेना:मुख्यमंत्र्यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्यामुळे शिवसैनिकांची निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण; कंगना म्हणाली - हे लज्जास्पद

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा
  • अधिकाऱ्यांच्या डोळ्याला आणि हाताला गंभीर दुखापत, पोलिसांनी दाखल केला गुन्हा

मुंबईत शिवसैनिकांनी शुक्रवारी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला त्यांच्या घरात घुसून मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केल्याने नाराज झालेल्या शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुखांनी आपल्या 5-6 कार्यकर्त्यांसोबत मिळून अधिकाऱ्याला मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही.

या प्रकरणात अभिनेत्री कंगना रनोटही पुढे आली आणि मारहाणीचा एक व्हिडिओ शेअर करत या घटनेला 'लज्जास्पद' म्हणले.

या भ्याड हल्ल्याचा आमदार अतुल भातखळकर यांनी तीव्र निषेध केला. असे कृत्य करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. भातखळकर म्हणाले की, निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांचे फक्त व्यंगचित्र व्हाट्सअप वरुन फॉरवर्ड केले म्हणून शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत. आता निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांवर सुद्धा हल्ला करण्याइतकी खालची पातळी शिवसेनेने गाठली आहे. अशा गुंडांना घाबरून राज्यातील व मुंबईतील जनता गप्प बसेल असे मुख्यमंत्र्यांना व शिवसेनेला वाटत असल्यास ते मोठ्या भ्रमात आहेत. सत्तेचा हा माज जनता येणाऱ्या काळात उतरवल्या शिवाय राहणार नाही असेही भातखळकर यांनी संगितले.