आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:गृहमंत्र्यांवरील आरोपांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांची नियुक्ती

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने एक सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली असून औरंगाबादेतील निवृत्त न्यायमूर्ती कैलासचंद उत्तमचंद चांदीवाल यांची समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

गृहमंत्री देशमुख यांनी वादग्रस्त सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेला दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते,असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना परमबीर यांनी पत्र पाठवले होते. या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती कैलासचंद चांदीवाल यांची नियुक्ती केली. सहा महिन्यात ते अहवाल सादर करतील.

बातम्या आणखी आहेत...