आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठा निर्णय:वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात 62 वर्षांपर्यंत वाढ; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी झाला निर्णय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सार्वजनिक उपक्रमांसाठी 7 व्या वेतन आयोगासाठी निकष

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट- अ मधील व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट अ मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षांपर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्योत्तर मान्यता देण्यात आली. सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांची नितांत आवश्यकता आहे. त्यांचा अनुभव साथरोग नियंत्रणात महत्त्वाचा ठरू शकतो.

याचा विचार करून शासनाकडून वैद्यकीय अधिकारी गट अ आणि वरिष्ठ अधिकारी (वेतनस्तर एस-२३ : ६७७००-२०८७०० व त्यावरील) तसेच राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ (वेतनस्तर एस-२० : ५६१००-१७७५००) यांचे निवृत्तीचे वय ३१ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये एक वर्षासाठी ६१ वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयास कार्योत्तर मंजुरी देण्याचा तसेच त्याअनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ मधील नियम १० मध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सार्वजनिक उपक्रमांसाठी ७ व्या वेतन आयोगासाठी निकष
राज्य सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासाठी निकष निश्चित करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

बातम्या आणखी आहेत...