आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थोरातांनी वृत्त फेटाळले:राजीनाम्याच्या वृत्तावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी सोडले मौन, म्हणाले - 'मलाही दिल्लीत गेल्यावरच हे वृत्त कळाले'

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या वृत्तानंतर थोरातांच्या राजीनाम्याच्या बातम्या आल्या.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान आता त्यांनी या वृत्तावर मौन सोडले आहे. राजीनामा दिला नसल्याचे ते म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी याविषयी भाष्य केले. तसेच अशा प्रकारच्या बातम्या कुठून आल्या याविषयी कोणतीही माहिती नसल्याचे ते म्हणाले. काँग्रेसमध्ये फेरबदल होण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या वृत्तानंतर थोरातांच्या राजीनाम्याच्या बातम्या आल्या.

याविषयी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'मी दिल्लीत गेलो त्याचा आणि राजीनाम्याचा कोणताही संबंध नाहीय. मी दर महिन्याला काही विषय असतात याविषयी चर्चा करण्यासाठी गेलो होतो. मी राजीनामा दिला असल्याचे वृत्त मलाही दिल्लीत समजले असल्याचेही ते म्हणाले. तसेच पुढे म्हणाले की, 'माझ्याकडे प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ नेता आणि महसूल मंत्री या तीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. दिल्लीमध्ये जाऊन योग्य प्रकारे त्या सांभाळेल असेही मी म्हणालो होतो. पण तरीही तुम्हाला आणखी कोणती जबाबदारी द्यायची असेल तर माझी हरकत नसल्याचेही ते म्हणाले होते. ऑक्टोबर महिन्यातदेखील मी कोणत्या जबाबदारीचे विभाजन करायचे असेल तर हरकत नसल्याचे स्पष्ट केले होते. एच के पाटील काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी झाले. यानंतर त्यांनाही मी ही वस्तुस्थिती सांगितली. मात्र अचानक हा मुद्दा का आला याची कल्पना नसल्याचेही ते म्हणाले.'

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser