आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात अटक झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जाला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) विरोध केला आहे. एनसीबीने सांगितले की दोघांनीही ड्रग्जच्या खरेदी-विक्रीला प्रोत्साहन दिले. एजन्सीने गंभीर आरोप केले की रिया चक्रवर्ती निर्दोष नसून फारच शातिर आहे. सुशांतसिंग राजपूतला ड्रग्जच्या जाळ्यात गुंतवण्यासाठी ती त्याच्याकडे गेली होती.
मंगळवारी बॉम्बे हायकोर्टात अभिनेत्री रिया चक्रवर्तीकडून दाखल करण्यात आलेल्या जामिन याचिकेवर 7 तास सुनावणी झाली. कोर्टात सर्व पक्षांची निवेदने नोंदवून निर्णय सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
ड्रग्स रॅकेटची अॅक्टिव्ह मेंबर आहे रिया
तपास यंत्रणेने कोर्टाला सांगितले की रिया चक्रवर्ती पूर्ण शुद्धीत आणि पूर्ण नियोजन करून ड्रग्जचा व्यापार करत होती. ती ड्रग सिंडिकेटची सक्रिय सदस्य होती, ज्यात अनेक नामांकित लोक आणि हाय सोसायटीचे अनेक प्रसिद्ध लोक आणि सप्लायर्सचा समावेश होता. एनसीबीने म्हटले आहे की रिया चक्रवर्ती दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतला ड्रग्ज सेवन करण्यास बढावा दिल्याची आरोपी आहे. रियाने सुशांतला ड्रग्सचे व्यसन लावले होते.
सुशांतसोबत राहून त्याचा विश्वासघात केला
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या अधिकाऱ्यांनुसार 'अॅक्टर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे संपूर्ण प्रकरण पाहता असे समोर येते की, रिया चक्रवर्तीला माहिती होते की, सुशांत सिंह राजपूत ड्रग्सचे सेवन करायचा आणि या काळात तिने त्याला असे करण्यास प्रोत्साहन तर दिलेच यासोबतच त्याच्यापासून सर्व गोष्ट लपवून ठेवण्यात आली.'
सुशांतच्या विरोधात फौजदारी कट रचला
एसीबीने रिया चक्रवर्तीला चतुर अपराधी मानत तिच्या जामीन याचिकेला विरोध केला आणि म्हटले की, तिच्याविरोधात असे काही पुरावे मिळाले आहेत. यावरुन कळते की, ती ड्रग ट्रॅफिकिंगमध्ये सामिल होती. एनसीबीने हे स्पष्ट केले आहे की, एका फौजदारी कटानुसार रियाने ड्रग्सच्या देवाण-घेवणीसाठी इतर आरोपींना समर्थन केले. त्यांना असे करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि पैशांनी त्यांची मदत केली.
रियाने देखील कोर्टात स्वीकारले
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात रियाने असे सांगितले की, सुशांतला सेवन करण्यासाठी दिलेल्या ड्रग्सचे पैसे तिने सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत दिले आहेत. एनसीबीने स्पष्ट केले की ज्या ड्रग्सचे तिने पैसे दिले होते ते ड्रग्स वैयक्तिक वापरासाठी नसून ती दुसर्या एखाद्याला पुरविली जात होती आणि हे एनडीपीएस 1985 च्या कलम 27 ए अंतर्गत येते.
रियाला सोडले तर पुरावे नष्ट होतील
एनसीबीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की चौकशी महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे आणि यावेळी रियाला जामीन मिळाल्यास तपासाला अडथळा येईल. एनसीबीने सांगितले की रिया ड्रग्सच्या तस्करीमध्ये सहभागी आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक पुरावे उपलब्ध आहेत. तिने केवळ ड्रग्सच्या वितरणामध्येच मदत केली नाही तर त्यांना क्रेडिट कार्ड, रोख रक्कम आणि अशा अनेक माध्यमातून पैसे दिले.
एजन्सी पुढे म्हणाली की रियाने तिच्या घरी ड्रग्स ठेवण्यास परवानगी दिली आणि सुशांतला सेवन करण्याचीही परवानगी दिली. एनसीबीने सांगितले की ही बाब आता एनडीपीएस (नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्स्टांसेस अॅक्ट) च्या अंतर्गत येते आणि म्हणूनच त्यांना अधिकार देण्यात आले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.