आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अमली पदार्थ कनेक्शनचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एनसीबीने रिया चक्रवर्तीची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. तब्बल 8 तास तिला वेग-वेगळे प्रश्न विचारण्यात आले. यानंतर पुन्हा उद्या तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाउस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि हेल्पर दीपेश सावंत यांना समोरा-समोर बसवून प्रश्न विचारले.
एनसीबीने या प्रकरणी ड्रग पेडलर अनुज केसवानी याला अटक केली आहे. याचा सुगावा कैझान इब्राहिमची चौकशी करताना लागला होता. आतापर्यंत या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, एम्सच्या फॉरेन्सिक बोर्डाचा अहवाल व्हिसेरा अहवाल 10 दिवसांनंतर येणार आहे. फॉरेन्सिक टीम या प्रकरणी विष प्रयोगाचा अँगल सुद्धा तपासत आहे.
इलेक्ट्रॉनिक व्यवहारांत ड्रग्स खरेदी केल्याचे पुरावे सापडले
एनसीबीचे उप-महासंचालक (दक्षिण-पश्चिम क्षेत्र) एम अशोक जैन यांनी सांगितल्याप्रमाणे, मी सध्या सविस्तर माहिती देऊ शकत नाही. कारण, मीडियाकडून आम्हाला बरीच माहिती मिळत आहे. अधिकाऱ्यांना फोन चॅटिंगचे रेकॉर्ड मिळाले आहेत. यातून प्रतिबंधित ड्रग्स खरेदी करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रियंका, आरएमएल रुग्णालयाच्या डॉक्टरांविरुद्ध रियाची तक्रार
रियाने पोलिसांत सुशांतची बहीण प्रियंकाच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार आणि इतर दोघांचीही नावे आहेत. या लोकांच्या विरोधात नारकोटिक्स ड्रग्स अँड साइकोट्रॉपिक सब्सटेंसेज अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी तिने केली. रियाच्या आरोपानुसार, प्रियंकाने 8 जून रोजी सुशांतला डॉ. तरुण यांनी लिहिलेली चिठ्ठी पाठवली होती. त्यामध्ये कायदेशीर सल्ला न घेताच औषधी घेण्यास सांगितले होते.
जेव्हापासून नोकरी सुरू केली, तेव्हापासून गांजा ओढायचा सुशांत -दिपेश
सुशांतचा हेल्पर राहिलेला दिपेश सांवतला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे, त्याने सप्टेंबर 2018 मध्ये सुशांतला घरात गांजा ओढताना पाहिले होते. "सप्टेंबर 2018 मध्येच मी सुशांतच्या घरी काम करणे सुरू केले होते. त्याचवेळी मी सुशांतला गांजा ओढताना पाहिले. याबद्दल मी अशोक भाईंना विचारले की सुशांत ड्रग्स घेतात का, त्यावर त्यांनी हो असे म्हटले होते. त्याने सांगितल्याप्रमाणे, करणने सर्वप्रथम सुशांत सरांना गांजा दिला होता." त्याने सुशांतला कधीही गांजा आणून दिलेला नाही. पण, आमचा एक सहकारी ऋषीकेश पवार सरांना (सुशांत) गांजा आणून देत होता. अब्बास खालोई हा सुशांतसाठी गांजा तयार करायचा आणि त्याच्यासोबतच घेत होता.
1.85 लाखांचा अमली पदार्थ जप्त
एनसीबीने कैझान इब्राहीमची चौकशी करताना रविवारी मुंबईत धाड टाकली आणि ड्रग्स जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत 1.85 लाखांच्या घरात आहे. यासोबतच काही परदेशी चलन सुद्धा सापडले आहे. या प्रकरणी अनुज नावाच्या एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.