आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न गायिका लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला कोरोना आणि न्यूमोनियामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'भारतरत्न' लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह देशातील अनेक दिग्गजांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, 'लता मंगेशकर यांच्या निधानामुळे झालेले दुःख हे शब्दांच्याही पलिकडचे आहे. लता दिदी आपल्याला सोडून गेल्या आहेत. त्यांच्या जाण्यामुळे देशामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरुन काढता येणे शक्य नाही. येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्या कायम स्मरणात राहतील. लता मंगशकर यांच्या आवाजामध्ये लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अशी क्षमता होती.'
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
गृहमंत्री अमित शाहांचे ट्विट
नितिन गडकरींचे लता मंगेशरांविषयी ट्विट
'देशाची शान आणि संगीत जगतातील शिरमोर स्वर कोकिळा भारत रत्न लता मंगेशकरजींचे आज निधन झाले आहे. पुण्यात्माला माझी श्रद्धांजली. त्यांचे जाणे देशासाठी अपरीमित हानी आहे. त्या सर्व संगीत साधकांसाठी सदैव प्रेरणा होत्या.'
संजय राऊतांचे दोन शब्दात श्रद्धांजली
कुमार विश्वास यांनी ट्विट करत वाहिली श्रद्धांजली
प्रकाश जावडेकरांनी व्यक्त केला शोक
जयप्रकाश नड्डा यांचे ट्विट
-
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.