आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडघ्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया:ऋषभ पंतच्या गुडघ्यावर मुंबईमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाच्या यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या गुडघ्यावर शनिवारी यशस्वीपणे शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रिया मुंबईतील काेकिलाबेन रुग्णालयात करण्यात आली. पार्दीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ऋषभ पंतवर उपचार सुरू आहेत. पार्दीवाला हे काेकिलाबेन रुग्णालयामध्ये सेंटर फाॅर स्पाेर्ट््स मेडिसिनचे संचालक आहेत. ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला हाेता.

यामुळे त्याला माेठी दुखापत झाली. त्याच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली आहे. आता त्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. डाॅ. पार्दीवाला यांनी आतापर्यंत मास्टर ब्लास्टर सचिनसह सिक्सर किंग युवराजसिंग, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांच्यासह अनेक ऑलिम्पियन खेळाडूंवर शस्त्रक्रिया केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...