आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शपथविधी:ऋतुजा लटके यांना विधानसभा सदस्यत्वाची दिली शपथ

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्य ऋतुजा रमेश लटके यांना साेमवारी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. विधानसभेचे सदस्य रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा या निवडून आल्या आहेत. या शपथविधी समारंभास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, ॲड. अनिल परब, सुनील प्रभू आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...