आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Third Day Of Riya's Interrogation Of NCB News And Updates: Riya Will Be Questioned Again In Drug Case, Arrest Possible; Case Filed Against Sushant's Sister Priyanka For Abetment To Suicide

सुशांत केसमध्ये मोठी कारवाई:रिया चक्रवर्तीला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो थोड्याच वेळात करणार अटक, यापूर्वी सलग तीन दिवस करण्यात आली होती चौकशी

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ड्रग्स केसमध्ये एनसीबीकडून रिया चक्रवर्तीला थोड्याच वेळात अटक करण्यात येणार आहे. यापूर्वी सलग तीन दिवस तिची चौकशी करण्यात आली होती.

सोमवारी रात्री सुशांत मृत्यू प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला. सीबीआयच्या गुन्ह्यातील आराेपी रिया चक्रवर्तीने सुशांतची बहीण प्रियांका, डॉक्टर आणि इतरांविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. रियाने मुंबई पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत प्रियांका सिंह, राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉ. तरुणकुमार व इतरांनी सुशांतला बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन दिल्याचा आणि त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. ही तक्रार सुशांत व त्याच्या बहिणीत 8 जूनच्या व्हॉट्सअॅप चॅटबाबत आहे. याच दिवशी रिया सुशांतचे घर सोडून गेली होती.