आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोपोलीजवळ सहलीची बस उलटली, एक मुलगा व एक मुलगीचा मृत्‍यू:मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना, सर्व विद्यार्थी चेंबूर परिसरातील

खोपोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली. या अपघातात सुमारे 48 विद्यार्थी जखमी झाले आहेत. वेट अ‌ॅण्ड जॉय येथून चेंबूरला परतताना या बसला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीनजीक अपघात झाला. प्रथमदर्शनी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर येत आहे.

विद्यार्थी चेंबूर परिसरातील

अपघातग्रस्त बसमधील विद्यार्थी चेंबूर परिसरातील आहेत. सुमारे पस्तीस विद्यार्थी चेंबूरमधून बसने सहलीसाठी खोपोलीत आले होते. त्यानंतर परतताना खोपोलीनजीक मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात घडला. या बसमध्ये 35 विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत असून बचाव कार्य करण्याचे काम सुरू आहे.

​​​​​

घटनास्थळी पोलिस रवाना झाले आहेत. बसमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात आले आहे. स्थानिकांसह पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सहलीसाठी खोपोलीला

चेंबूरमधील एका क्लासचे हे विद्यार्थी असून सहलीसाठी खोपोलीला गेले होते. अपघातात 25 विद्यार्थी जखमी झाले आहेत. रायगड जिल्ह्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही बस मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी बसच्या वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि काही कळण्याच्या आत ही बस उलटली.

अपघातानंतर माहिती मिळताच लागलीच बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातामुळे मुंंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात घडला त्या परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्याचेही काम सुरू करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...