आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Rohit Pawar । Maharashtra Health Department Exam । Rohit Pawar's Request To The State Government To Conduct The Examination Through MPSC In The Near Future

परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून रोहित पवारांचा राज्य सरकारला घरचा आहेर, येत्या काळात परीक्षा MPSC मार्फत घेण्याची केली विनंती

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून गोंधळ उडाला आहे. अशातच सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांसह अनेक पक्षातील नेते आरोप- प्रत्यारोप करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'परीक्षा घेणाऱ्या कंपन्याकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यानं परीक्षार्थींना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. शासनाने संबंधित कंपनीला आदेश देऊन परीक्षा केंद्र बदलावे.' अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

'उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा MPSC मार्फतच घेण्यात याव्यात' अशी विनंती देखील पवार यांनी राज्य सरकारला केली आहे. रोहित यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही मागणी केली आहे. एकाच दिवशी दोन पेपर देणे विद्यार्थ्यांना शक्य नसून, परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यात जावे लागत आहे. अशातच दोन्ही पेपर एकच दिवशी असल्याने विद्यार्थ्यांना पेपरसाठी मुकावे लागत आहे.

शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत. तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा. अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...