आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मदत:मुंबईतील डबेवाल्यांना रोहित पवारांनी दिला मदतीचा हात, 5 हजार सदस्यांसाठी उभारला निधी

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इतर नागरिकांनाही डबेवाल्यांना मदत करावी, रोहित पवारांनी केले आवाहन

कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनचा फटका मुंबईतील डबेवाल्यांना देखील बसला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे काम नसल्याने डबेवाल्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशातच आमदार रोहित पवार यांनी पुढे येत डबेवाल्यांना मदतीचा हात दिला आहे. मुंबईकर उपाशी राहू नये यासाठी डबेवाले घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावत असतात.

आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील डबेवाल्यांसाठी निधी उभा करून दिला आहे. शिवाय इतर नागरिकांनाही डबेवाल्यांना मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, “मुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहेत. काल त्यांना भेटलो. त्यांच्या संघटनेचे सुमारे 5 हजार सदस्य असून अडचणीतील सदस्यांना मदतीचा हात देता यावा यासाठी त्यांनी एक निधी उभा केलाय. आपल्याच परिवारातील घटक असलेल्या या डबेवाल्यांना मदत करायची तुमची इच्छा असेल तर फोटोवरील नंबरवर संपर्क करावा.”

0