आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस विरुद्ध रोहित पवार:पेट्रोल-डीझेलच्या किमतींवर देवेंद्र फडणवीस राज्याच्या जनतेशी खोटे बोलत आहेत, रोहित पवारांनी व्हिडिओ जारी करून केला खुलासा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल आणि डीझेलचे दिवसेंदिवस वाढते दर राज्य आणि देशभरात संतापाचा विषय बनला आहे. यावरूनच आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये जुंपली आहे. इंधनाच्या वाढत्या दरांच्या विरोधात महाविकास आघाडीचे ठिक-ठिकाणी आंदोलन झाले. पण, यासाठी राज्य सरकार आणि राज्य सरकारची कर पद्धत जबाबदार असल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. तोच दावा आता एक व्हिडिओ जारी करून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खोडून काढला आहे.

फडणवीस खोटे बोलतात -रोहित पवार
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिमध्ये फडणवीसांनी काय म्हटले आणि राज्य सरकारला कसे जबाबदार धरले हे दाखवण्यात आले. तर पुढे याच व्हिडिओमध्ये फडणवीस कसे खोटे बोलत आहेत त्याची पोलखोल रोहित पवारांनी केली. व्हिडिओ ट्विट करून रोहित पवारांनी लिहिले, "खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असे हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आले. देशात इतर कुठेही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही."

रोहित पवार पुढे म्हणाले, "केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या 32.90 रु पैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला 12 रु मिळत असल्याचे सांगतात."

"विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी 12 रु दिसत असतील तर याला काय म्हणावे? सगळीकडे अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असे धडधडीत खोटे बोलणे कुठल्याही नेतृत्वाला शोभणारे नाही."

काय म्हणाले होते फडणवीस?
पेट्रोल-डिझेल आपल्याकडे 30 रुपयांमध्ये (प्रति लिटर) मिळते. त्यावर काही कर आणि वाहतूक खर्च मिळून त्यावर केंद्र सरकार 32 रुपये कर लादते आणि त्यातून राज्य सरकारला 12 रुपये मिळतात. त्यातही राज्य सरकारकडून अतिरिक्त 30 रुपये कर आकारला जातो. एकूण 100 रुपये पेट्रोलचे दर असेल तर 42 रुपये हे एकट्या राज्य सरकारच्या खिशात जातात असा दावा फडणवीसांनी पुण्यात बोलताना केला होता.

बातम्या आणखी आहेत...