आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी एक खतरनाक व्हिडीओ ट्विट केलाय. त्याला फक्त सत्य मेव जयते! हे एकच जोडून प्रतिक्रिया दिलीय.
राऊतांच्या जामिनावर ठाकरे गटाकडून आनंद व्यक्त होतोय. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
काय म्हणाले रोहित?
रोहित पवार यांनी संजय राऊतांना जामीन मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी मी व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यात सर्व काही आलेय, असे म्हणत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. रोहित यांनी पिंजऱ्यातून एक बाहेर पडत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यावर सत्य मेव जयते!, हे वाक्य लिहित आपली भावना व्यक्त केलीय.
काय म्हणाले दानवे?
विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही संजय राऊत यांच्या जामिनाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, माननीय न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाचे मनःपूर्वक आभार. विरोधकांनी आता आपल्या राजकीय सतरंज्या सांभाळाव्यात. आणि हो, कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे.
लेकी, सुनांचा अभिमान - सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, संजय राऊत लवकरच बाहेर येतील. मी भविष्य सांगू सकत नाही. वास्तवतेत जगते. आमचे जे-जे नेते जेलमध्ये आहे. ते त्यांच्या केसेसमधून निर्दोष बाहेर येतील. ते महाराष्ट्र, भारताच्या सेवेत पूर्ण ताकदीने लागतील. अनिल देशमुखांना एका केसमध्ये एक बेल मिळालीय. सगळ्यांच्या लेकी, सुना पूर्ण ताकदीने कोर्टात जाताय. वकिलाकडे जातायत. जेलमध्ये जावून लढतायत. त्यांचा अभिमानय. त्यांना माहितीय विजय त्यांचा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी संजय राऊत हे वॉशिंग मशीनला पायाने ठोकरतायत, असा फोटो पोस्ट केलाय. त्या मशीनवर वॉशिंग मशीन बीजेपी, अशी ओळ लिहिलेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.