आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांचे कौतुक:रोहित पवारांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक, तर राज्यातील भाजपच्या नेत्यांना 'ही' जाणीव करुन देण्याची केली मागणी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील भाजप नेत्यांना कोरोनावरुन महाविकास आघाडीवर टीका करण्याच्या मुद्द्यावरुन टोला लगावला

देशातील प्रदुषण दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालता यावा यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेल्या कामाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले आहे. मात्र, याचवेळी कोरोनावरुन राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजपा नेत्यांवरही रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले की, 'गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांमध्ये केलेले काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचे कौतुक करायलाच हवे. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असेच काम होईल, असा विश्वास आहे.'

यासोबतच अजून एक ट्विट रोहित पवारांनी केले आहे. यामध्ये त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना कोरोनावरुन महाविकास आघाडीवर टीका करण्याच्या मुद्द्यावरुन टोला लगावला आहे. ते म्हणाले, 'कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगापुढचे सर्वात मोठे आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन मोदीजींनी जी 20 परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला. त्यांनी या संकटाची जाणीव भाजपाच्या राज्यातील नेत्यांनाही करुन दिली तर ते या संकटाचा राजकीय खेळ थांबवतील.'

बातम्या आणखी आहेत...