आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभेत मंगळवारी गुलाम नबी आझाद यांच्यासह चार खासदारांचा निरोप समारंभ पार पडला. गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झालेले दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोदींच्या या कृतीचे कौतुक केले. मोदीजींना भारतीय राजकारणातील आपल्या पूर्वसूरींनी घालून दिलेला मार्गावरून चालताना पाहून आनंद वाटला असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले रोहित पवार ?
राज्यसभेत विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब भावूक झाल्याचं पहायला मिळालं. 'पक्षीय मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत', या भारतीय राजकारणातील आपल्या पूर्वसूरींनी घालून दिलेला मार्गावरून मोदीजींना चालताना पाहून आनंद वाटला.
मोदींना अश्रू अनावर का झाले?
राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासह शमशेर सिंह, मीर मोहम्मद फैयाज, नादिर अहमद हे सदस्य निवृत्त झाले. त्यांना निरोप देण्यासाठी नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. यावेळी त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या सोबत असलेल्या आपल्या मैत्रीचा उल्लेख केला. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना मोदींना अश्रू अनावर झाले. मोदींची अशी अवस्था एक दोन मिनिटे नाही तर जवळपास पाच मिनिटे होती. मोदी आझादांबद्दल बोलत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जवळपास तीन वेळेस मोदींनी अश्रू पुसले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.