आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमा अंधारे प्रकरणावरुन रोहित पवार यांचा निशाणा:सत्तेत असल्यामुळे गृहखात्याचा गैरवापर करणे योग्य नाही

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तेत असल्यामुळे तुम्ही गृहखात्याचा गैरवापर करत असाल तर तो योग्य नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदारा रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची जळगावमध्ये सभा होती. पण, त्यांच्या सभेला पोलिस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

कुठलाही कार्यक्रम आपल्याला घ्यायचा असेल तर परवानगी दिली जाते. अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा तो भाग एक आहे. एक व्यक्ती भाषण करत असताना ते ऐकण्यासाठी लोकही मोठ्या संख्येने येत असतील. तेव्हा तुमच्या हातात गृहमंत्रालय असेल आणि तुम्ही परवानगी देत नसाल तर ते चुकीचे आहे. हे संविधानाच्याविरोधात आहे. जर असे महाराष्ट्रात होत असेल तर हे लोकांना पटणारे नाही.

पुढे ते म्हणाले की, एखादा पक्ष सोडून दुसरा पक्ष चालू करणे ही एक वेगळी गोष्ट आहे. पण, एखाद्या पक्षाला फोडून तुम्ही वेगळा गट स्थापन करत असाल तर ते अयोग्य आहे. जो पक्ष अनेक वर्षांपासून लोकांच्या सेवेसाठी काम करत होता. त्या पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी फोडने चुकीचे आहे.

अंधारे यांनी ऑनलाईन सभा घेतली
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारेंची सभा होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्ह्यात कलम 144 लागू करत सभेला परवानगी नाकारण्यात आली. यानंतर सुषमा अंधारे या आक्रमक झाल्या. कोणत्याही स्थितीत सभा घेणारच, असे त्यांनी ठणकावले.

यानंतर सुषमा अंधारे यांनी आज रात्री 10 च्या सुमारास ऑनलाईन सभा घेतली. यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, तुम्ही हे समजा की, हीच आपली ऑनलाईन सभा आहे आणि मला ती गनिमी काव्याने करणे भाग आहे. तुम्ही विचार करा की, चिथावणीखोर आयपीसी सेक्शन 153 (A) कधी लागू होऊ होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्याने दंगल किंवा दंगलसदृष्ट परिस्थिती निर्माण होऊ शकते.

कष्टाची भाकरी खाते, तरीही गुलाबभाऊ का घाबरता?

''माझ्याकडे पन्नास खोके नाही. माझ्याकडे कसलीही यंत्रणा नाही. वाळूचे गुत्ते नाही ना.. दारूचे हातभट्टीचे गुत्ते. मी कष्टाची भाकरी खाते, गुलाबराव पाटलांसारखे वाय प्लस सुरक्षाही नाही. पण, हे लोक किती घाबरले आहेत का घाबरत आहेत असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...