आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदेंचा दिल्लीत अपमान:आ. रोहीत पवारांची खत; म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची सातवी बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत देशभरातील राज्याचे मुख्यमंत्री यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला हजर होते. निती आयोगाच्या बैठकीदरम्यान झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुय्यम वागणूक दिली गेली. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी केला आहे. पवार यांनी ट्विट करून ही भूमीका मांडली.

आयोगाच्या बैठकीदरम्यान एका कार्यक्रमातील फोटोत सर्वाच शेवटच्या रांगेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उभे होते. यावरून रोहीत पवार यांनी यापुढे केंद्रशासनाकडून चांगली वागणूक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दिली जाईल, असे आशा व्यक्त केली. तर एकाप्रकारे शिंदे यांना चांगलाच टोला लगावला आहे.

रोहीत पवार म्हणाले
"एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात'' असं रोहीत पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी फेसबुक व ट्विट करून हे मत व्यक्त केले आहे.

समाजमाध्यमावर चर्चा रंगली

राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी सोशल मिडियावर शेअर केला. ट्विटर व फेसबुकद्वारे शेअर केल्यानंतर त्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. दरम्यान, नीती आयोगाच्या बैठकीतील फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घालू लागला आहे. केंद्रसरकारच्या दुटप्पी वागणूकीवर शिंदे, फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. दुसरीकडे मोदी फॅनकडून देखील विरोधकांचा समाचार घेतला जात आहे. समाजमाध्यमावरील प्रतिक्रियेतून जोरदार टिका टिप्पणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...