आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित पवारांची फेसबुक पोस्ट चर्चेत:चित्ते रुळले असतील तर आता लम्पीकडेही जरा लक्ष द्या

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी ‘गोधन खतरे मे’ सांगणारे नेते आज गोधन खऱ्या अर्थाने संकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत. राजकारणासाठी ज्यांचा तिसरा डोळा क्षणार्धात उघडतो तो अद्यापही उघडलेला नाही. चित्ते रुळले असतील तर राष्ट्रीय मीडियानेही लम्पीकडे लक्ष केंद्रित करायला हरकत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले की, देशात 82 हजार जनावरे लंम्पी आजाराने दगावली तर लाखो जनावरे लंम्पीग्रस्त असल्याने पशुधनावर आणि पर्यायाने बळीराजासमोर मोठे संकट उभे राहिलेय. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री स्वतः जातीने लक्ष ठेवून असल्याने काही अंशी दिलासा नक्कीच मिळत आहे.

अतिरिक्त मदत गरजेची

पुढे ते म्हणाले की, मृत पावलेल्या पशुधनास #NDRF निकषात असलेल्या मदतीप्रमाणे राज्यसरकार स्वतःच्या तिजोरीतून 30 हजार रुपयांची मदत देत आहे. परंतु सात वर्षे जुने NDRF निकष आणि दुधाळ जनावरांच्या वाढलेल्या किंमती बघता ही मदत पुरेशी नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं अतिरिक्त मदत मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली.

केंद्राकडे पाठपुरावा करा

पवार म्हणाले, केंद्र सरकारने लम्पी आजाराला epidemic म्हणून घोषित केल्यास SDRF मधील ‘आपत्ती निवारण आणि पुनर्वसन’ या सेक्शन अंतर्गत मदत देता येऊ शकते. असे झाल्यास शेतकऱ्यांना राज्य शासनाची 30 हजार आणि #SDRF ची 30 हजार अशी एकूण 60 हजारांपर्यंत मदत मिळू शकते. राज्यशासनाने या संदर्भात केंद्राकडे त्वरित पाठपुरावा करायला हवा, असे ते म्हणाले.

लम्पी चर्मरोगाचा शिरकाव

लंपी आजाराच्या प्रादुर्भावामुळे पशुधन धोक्यात आले आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पशूंमध्ये लम्पी चर्मरोगाचा शिरकाव होण्यास सुरूवात झाली. अवघ्या दीड महिन्यात राज्यातील तब्बल 682 गावांमध्ये लम्पीचा संसर्ग पसरला असून आतापर्यंत 89 जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वप्रथम 4 ऑगस्टला जळगाव जिल्ह्यातील रावेत तालुक्यात लम्पी चर्मरोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर खान्देश, मराठवाडा, विदर्भातील इतर जिल्ह्यात संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली.

लंपीवर अशी करता येईल मात

राज्यातील लम्पी या विषाणुजन्य आजाराचा प्रसार व घ्यावयाची काळजी यासंदर्भात पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणीचे प्राध्यापक डॉ.नितीन मार्कंडेय यांच्याशी 'दैनिक दिव्य मराठी'ने संपर्क साधला असता त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली. येथे वाचा संपुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...