आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांना रोखठोक उत्तर:म्हणाले - राजकीय नेते गप्प बसले तरी सामान्यांचा आवाज दाबता येणार नाही

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कितीही प्रयत्न करा, सामान्यांचा आवाज दाबता येणार नाही, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

कोणते प्रकल्प महाराष्ट्रातून गेले आणि कोणामुळे गेले यावरून राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा कलगीतुरा रंगलेला आहे. त्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातला आहे, असा आरोप केला होता. त्याला आज रोहित पवारांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाले फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले होते की, महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेले हे महाविकास आघाडीचे पाप आहे. महाराष्ट्रात आमचे सरकार येऊन तीनच महिने झाले, तरीही महाराष्ट्रातून उद्योग चालले आहेत, असे फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय. या फेक नेरेटिव्हमध्ये काही राजकीय पक्ष आणि त्यांची इकोसिस्टिम आणि दुर्दैवाने बोटावर मोजण्याइतके चार-पाच HMV (His Masters Voice) पत्रकार. हे सगळे मिळून महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातलाय, असा आरोप त्यांनी केला होता.

पवारांचे उत्तर काय?

रोहित पवार यांनी एक ट्विट करून फडणवीसांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात की, महाराष्ट्राची बाजू मांडणारा मग तो पत्रकार असो.. युवा असो... किंवा सामान्य नागरिक असो.. हे सर्वचजण नक्कीच #HMV म्हणजे #He_is_Maharashtra's_Voice आहेत. राजकीय नेते गप्प बसले तरी खरे #HMV मात्र महाराष्ट्राची भूमिका मांडताना कधीही गप्प बसणार नाहीत.

महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी...

पवार आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात की, कितीही प्रयत्न केले तरी सामान्यांचा आवाज दाबता येत नाही. आजची राजकीय परिस्थिती बघता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्या प्रत्येकालाच आवाज उठवावा लागणार आहे आणि #WMV म्हणजेच #We_Are_Maharashtra's_Voice व्हावं लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...