आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना विरुद्ध भाजप:देश जिंकूनही राजा आनंदी नाही,मग प्रजा कशी आनंदी राहणार?, खासदार संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना सवाल

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंदी देशाच्या बाबतीत आपल्या देशाचा 136 वा क्रमांक लागतो आहे. पाकिस्तान, बांगलादेश आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहेत. पंतप्रधान मोदी हे निवडणुकांमागून निवडणुका जिंकतात, त्यांचा पक्ष विजयाचा आनंद साजरा करतो, पण तरीही देश आनंदी का नाही? फिनलॅण्ड पहिल्या क्रमांकाचा आनंदी देश ठरला. त्यांचे राज्यकर्ते जनतेशी इमान राखतात, खोटे बोलत नाहीत. त्यामुळे राजा व प्रजा, दोघेही आनंदी आहेत! असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. 4 राज्यात भाजपचा विजय झाला, पण राजा खुश झाला नाही, देश जिंकूनही राजा आनंदी नाही. मग प्रजा कशी आनंदी राहणार?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. तर जगावरचे साम्राज्य गमावूनही ब्रिटन आनंदी आहे. मात्र युक्रेन बेचिराख करूनही पुतीन व त्यांचा रशिया दुःखी आहे. असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

नेमके काय म्हटलेय संजय राऊत?
देशाचे मोठे पण कशात आहे, देशाचा आनंद कशात आहे, यावर संसदेत चर्चा व्हायला हवी संसदेतील सर्वच चर्चा आता रटाळ होत आहेत. मोदी भक्तांची संख्या संसदेच्या सभागृहात वाढली आहे. त्यातील अनेकांना विनोदाचे, खिलाडूपणाचे वावडे आहे. त्यामुळे संसदेतील आनंद संपला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष जिंकला. त्याचा आनंद सोहळा साजरा झाला; पण जागतिक आनंदी देशांच्या यादीत भारत 136 व्या स्थानावर घसरला. पाकिस्तान आपल्यापेक्षा वरच्या स्थानावर म्हणजे 121 व्या क्रमांकावर आहे. भाजप जिंकला म्हणजे देश जिंकला, मोदी जिंकले म्हणजे देश आनंदी झाला, असे जग मान्य करायला तयार नाही, असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला आहे.

आनंद हरवला का?
देशाच्या राजकारणातला आनंद संपला आहे. सूडाचे, द्वेषाचे प्रवाह वाहत आहेत. एक दुसऱ्यांना संपवून टाकायचे या आनंदात जगणाऱ्यांच्या हाती राजकारणाची सूत्रे आहेत. त्यांनी लोकांना अंध भक्त आणि गुलाम केले आहे. नोटाबंदीच्या काळात लोकांना बँकांच्या रांगेत उभे केले. लोक नोकरीसाठी आणि रेशनसाठी वर्षानुवर्षे रांगेत आहेत. काम करून घेण्यासाठी लाच द्यावीच लागते. पंजाब आणि दिल्लीत आपचे सरकार आले. त्यांनी ठरवले, लोकांना रेशनसाठी यापुढे रांगेत उभे राहावे लागणार नाही, लोकांना घरपोच रेशन मिळेल. या निर्णयाची विरोधकांनी खिल्ली उडविली. हे कसे शक्य आहे? त्यावर अरविंद केजरीवाल म्हणाले, का शक्य नाही? घरपोच पिझ्झा मिळतो, मग गरीबांना रेशन का नाही? हा आनंदच आहे. असे अनेक आनंद आपण गमावून बसलो आहोत.

बातम्या आणखी आहेत...