आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसआरए घोटाळा प्रकरण:साप म्हणून दोरीच बडवतायत, आरोपांत तथ्य नाही : पेडणेकर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसआरए घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची मंगळवारी दादर पोलिसांनी तब्बल अडीच तास चौकशी केली. चौकशीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘पोलिसांना मी सर्व उत्तरे दिली आहेत. मात्र, माझ्यावर आरोप करून उगीच सापाच्या नावाखाली विरोधक दोरी बडवत आहेत. माझ्यावर जे आरोप करण्यात आलेत, त्यामध्ये दहा टक्केही सत्यता नाही.’ पेडणेकरांनी म्हणाल्या, यापुढे मी सोमय्यांना उत्तर देणार नाही. केवळ कायद्याची लढाई लढेल. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून मी निवेदन देणार आहे. तो माझा हक्क आहे.

बातम्या आणखी आहेत...