आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण:राजन विचारेंनी महिलांच्या आडून भ्याड राजकारण करु नये; मीनाक्षी शिंदेंचा हल्लाबोल

ठाणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुषार्थ शिल्लक असेल तर राजन विचारेंनी पुढे यावे- मीनाक्षी शिंदे - Divya Marathi
पुरुषार्थ शिल्लक असेल तर राजन विचारेंनी पुढे यावे- मीनाक्षी शिंदे

खासदारांमध्ये जर थोडा जरी पुरुषार्थ शिल्लक असेल तर त्यांनी रस्त्यावर यावे. मुलींना पुढे करत जर तुम्ही भ्याड राजकारण करत असाल तर महिला आघाडीतर्फे आम्ही त्यांचा निषेध करू असे शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांनी म्हटले आहे. तर जी मुलगी स्वत: जाऊन् तक्रार दाखल करते, आणि त्यानंतर 5 ते 6 तासांनी ती सिरीयस होत असेल तर यामागे काही तरी वेगळे गोंडबंगाल आहे.

मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, शिंदे गटाकडून कुणीही आक्षेपार्ह विधान केल नाही. आजपर्यंत त्याला आम्ही उत्तर दिले नाही. ठाण्यातील खासदारांनी एक महिलांची टीम बनवून हे आक्षेपार्ह विधान फेसबूवर टाकायला लावत आहे. खासदार पुरुष म्हणून स्वत: पुढे येत नसल्याची टीका देखील यावेळी मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. पण डोक्याच्यावर जात आहे. हे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याबद्दल असे विधान करत आहे.

तर ती जिवंत राहिली नसती

मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, आम्ही आजपर्यंत संयम बाळागला असून जे वारंवार आक्षेपार्ह बोलत आहे त्यांना समज देणे आमचे काम आहे. 100 ते 200 लोकांच्या मॉबने तिला जर पोटावर मारहाण केली असती तर ती जिवंत राहिली नसती.

मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, खासदारांमध्ये जर थोडा जरी पुरुषार्थ शिल्लक असेल तर त्यांनी रस्त्यावर यावे. मुलींना पुढे करत जर तुम्ही भ्याड राजकारण करत असाल तर याचा निषेध ठाण्याच्या महिला आघाडीकडून आम्ही करू.

माहोल तयार करताय

मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली नाही. तिथे केवळ थोडीफार धक्काबुक्की झाली. तिला डॉक्टरांनी घरी जाण्याचे सांगितले होते. मात्र, माहोल तयार करण्यासाठी खासदारांनी तिला संपदा रुग्णालयात अॅडमिट केले आहे.

मुख्यमंत्री उत्तर देण्यास बांधील नाही

मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबद्दल काही माहिती नाही. मुख्यमंत्री शिंदे एवढ्या थोट्या मोठ्या गोष्टीत पडत नाही. ते लोकांना उत्तर देण्यासाठी बांधील नाहीत. आमच्या महिला आघाडीला ते सर्व आक्षेपार्ह वाटल्यामुळे आम्ही तिला समजविण्यासाठी तिथे गेलो. मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या हातून विकास होत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे. मुख्यमंत्र्यांना मागे खेचण्यासाठी महिलांना पुढे करण्यात येत आहे, असा आरोप शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे.

पोलिसांवर दबाव, आव्हाडांचा आरोप

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ठाकरे गटाच्या रोशणी शिंदे यांना ठाण्यात शिंदे गटाकडून मारहाण झाली. मला खात्री आहे काही होणार नाही. न्यायची अपेक्षा सोडली. सरकार कसे चालवायचे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडून शिकावे. पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही ठाण्यात. विचारले तर पोलिस सांगतात वरुन प्रेशर आहे, अशा शब्दांत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

शिंदेंच्या सांगण्यावरुनच हल्ला- संजय राऊत

मुख्यमंत्री शिंदे यांच्या सांगण्यावरून ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याचा थेट आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ठाण्यातील पोलिसांनी हातात बांगड्या घातल्या आहेत का? तिथे कायद्याचे राज्य आहे की नाही? हल्लेखोरांवर कारवाई का होत नाही?, असा सवाल राज्य सरकारला विचारत राऊत म्हणाले की, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही हल्ला कसा करायचा हे माहीत आहे. ठाण्यातील या घटनेवरून त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.