आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुद्वेष्टे घरातच, ते कपाळ करंटे!:शिवसेनेतून सडलेल्या पानांची पानगळ सुरू; आता नवे कोंब फुटले, ठाकरेंची तडाखेबंद मुलाखत

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''शिवसेनेतून आज पालापाचोळा उडत आहे, जी पानं गळणे गरजेची आहेत ती गळत आहेत. झाडाकडून सर्व काही मिळाल्यानंतर पानं टवटवीत झाले की, गळुन पडतात; पानगळ होते तेव्हा आपल्याला वाटते की झाडाला काय झाले असेल, पण आठ दहा दिवसानंतर झाड हिरवेगार होतेच. हिंदुद्वेषी घरातच आहेत ते कपाळ करंटे आहेत." हा अशा घणाघात भाजप आणि शिंदे गटावर शिवसेना प्रमूख उद्धव ठाकरे यांनी केला.

सामनाला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांची तडाखेबंद मुलाखत सामनाचे संपादक आणि शिवसेना नते तथा खासदार संजय राऊत यांनी घेतली त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेच्या झाडाला नवीन कोंब फुटले

ठाकरे म्हणाले, आता शिवसेनेच्या झाडाला नवीन कोंब फुटत आहेत. ज्येष्ठ शिवसैनिक येऊन भेटतात. त्यांना संघर्ष काय हे कळलेले आहेत. ते आशिर्वाद देत आहेत. हे आमच्यासाठी महत्वाची बाब आहे.

मी म्हटले मातोश्रीवर जायचेय

ठाकरे म्हणाले, जेव्हा माझी शस्त्रक्रीया झाली. तेव्हा मला सुटी देताना डाॅक्टर म्हणाले की, सर कुठे जायचे मातोश्री की वर्षा मी म्हटलो मातोश्री..मी शुद्धीवर नसलो असतो तरी गुंगीतही मातोश्रीच म्हटलो असतो. मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रासाठी वैभवशाही पण मला त्याचा मोह नव्हता.

मी गुंगीत असताना काहींची हालचाल वाढली

ठाकरे म्हणाले, मी गुंगीत असताना माझे सरकार पाडले जात होते. तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया कुठल्याही डाॅक्टरांना विचारल्यानंतर मानेचे धोके गंभीर असतात. अचानक पाच सहा दिवसानंतर सकाळी जाग आली, आळस देताना मानेची हालचाल बंद झाली. तो गोल्डन अवर होता त्यातच माझे ऑपरेशन झाले म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा आहे. मी बरा व्हावा म्हणून काहीजण देवाची पूजा करीत होते तर मी असाच राहावा म्हणून काहीजण देव पाण्यात ठेवून होते, ती गोष्ट माझ्यासाठी आयुष्यभर आठवणीत होती. जेव्हा माझी हालचाल बंद होत होती तेव्हा काही जणांची हालचाल वाढत होती.

सत्ता मेव जयते भाजप, शिंदेंचे ब्रीद

बाळासाहेबांचे नाव भाजप आणि शिंदे गट घेत आहेत. त्यांचे नाव पुढे करुन ते समाजात सम्रंभ करीत आहेत. मला देशाच्या घटनेवर विश्वास आहे. चोरी मारी सर्वत्र चालते पण मी सत्यमेव जयते मानतो. आज सत्ता मेव जयते हा शिंदे आणि भाजपचे ब्रीद आहेत.

ज्यांच्यावर विश्वास त्यांच्याकडूनच धोका

ठाकरे म्हणाले, ज्यांना मी अधिकार दिले होते. त्या शिंदे यांनीच धोका दिला. माझ्याकडे साधी खाती ठेवली होती. आयटी माझ्याकडे ठेवले होते तंत्रज्ञानामुळे समाजाचा कसा फायदा होईल यासाठी ते ठेवले होते.

चुक माझी, गुन्हा माझा

ठाकरे म्हणाले, चुक माझी आहे. गुन्हा माझा आहे की मी शिंदे यांना परिवारातील समजलो. समजा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केले असते तर त्यांनी वेगळे काय केले असते त्यांची राक्षसी महत्वकांक्षा आहे. त्यांना अजून काय हवे आहे. ते स्वतःला बाळासाहेब मानत आहेत.

तर..जनतेने उठाव केला असता

ठाकरे म्हणाले, मविआचा प्रयोग चुकला असता तर जनतेने उठाव केला असता पण तसे झाले नाही. सत्ता येताच आम्ही जनतेची कामे केली, निर्णय घेतले. पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांत माझे नाव घेतले जात आहे ते जनतेमुळेच घेतले जात आहे. कोरोनाकाळात परिस्थिती तशी होती आणि लोक ऐकत होते. मी बाहेर पडलो असतो तर लोकांना सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण असे झाले असते.

विश्वासघाताचा शिक्का कसा पुसणार?

उद्धव ठाकरे म्हणाले, ते मंत्री झाले तरीही त्यांच्या कपाळावरचा विश्वासघाताचा शिक्का कसा पुसणार आहेत. सामान्यांना बाळासाहेबांनी असामान्य पद दिली, आता माझी वेळ आहे. सामान्यांना असामान्य मी शिवसैनिकांना बनवणार आहे. ज्या आईने जन्म दिला त्या आईला अर्थात शिवसेनेला गिळायला बंडखोर निघाले आहेत.

यंत्रणेच्या गैरवापरातून काय साधणार?

ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र खूप सुंदर आहे, पण ग्रामीण आमदारांना गुवाहाटीची भुरळ पडते राज्याची नव्हे हे वाईट आहे. केंद्रीय तपास यंत्रणा गैरवापर ते करीत आहेत, पण त्यातून काय साधणार आहे.

बातम्या आणखी आहेत...