आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RPFने 9 महिन्यांत वाचवले 62 जणांचे प्राण:रेल्वे मालमत्तेपासून ते प्रवाशांचेही ऑन-ड्यूटी रक्षण करतात जवान

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) 'मिशन जीवन रक्षक' अंतर्गत जानेवारी ते सप्टेंबर 2022 पर्यंत सुमारे 62 जणांचे प्राण वाचवले. गेल्या 9 महिन्यांत असे अनेक अपघात झाले, ज्यात जवानांनी पुढे येऊन लोकांना मदत केली.

आरपीएफ जवानांवर केवळ रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी नाही, तर ते कर्तव्यावर असताना लोकांचे जीवही वाचवतात.

9 महिन्यांत वाचवले 62 जणांचे प्राण

या 62 घटनांपैकी 24 घटना एकट्या मुंबई विभागातील आहेत. नागपूर विभागात 14, तर पुणे विभागात 12 घटनांची नोंद झाली आहेत. तसेच भुसावळ विभागात 8, तर सोलापूर विभागात 4 घटनांची नोंद झाली आहे.

रेल्वेची मालमत्ता वाचवण्यापासून ते प्रवाशांच्या सुरक्षेपर्यंत

आरपीएफ जवानांना अनेक सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो, जसे की प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, हिंसाचार, रेल्वे वाहतुकीत अडथळा, हरवलेल्या मुलांचा शोध आणि गाड्या आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, कोणत्याही व्यक्तीचा अपघात होणे. या सगळ्यात ते प्रवाशांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष ठेवून असतात.

सतर्क RPFने बर्‍याच प्रकरणांमध्ये धावत्या गाड्यांमध्ये चढताना किंवा उतरताना निष्काळजीपणाने वागणाऱ्या प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनाही आरपीएफ जवानांनी वाचवले आहे.

बातम्या आणखी आहेत...