आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:26 साखर कारखान्यांचा शेतकऱ्यांना 193 कोटी रुपयांचा चुना; एफआरपीचे पैसे देण्यास टाळाटाळ

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फडणवीस सरकारच्या काळातील वसुलीही बाकी

राज्यातील २६ साखर कारखान्यांनी वर्ष २०१९-२० मधील हंगामात केलेल्या गाळपाचे १९३ कोटी उसाचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर सहकार विभागाने नगर जिल्ह्यातील युटेक शुगर्स या एका कारखान्यावर तोंडदेखली कारवाई केली आहे. वर्ष २०१९-२० च्या ऊस हंगामात १४४ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला हाेता. या कारखान्यांनी ५५० लाख टन उसाची तोड केली होती. त्याची एफआरपी (योग्य व मोबदला देणारी किंमत) १३ हजार ७९० कोटी इतकी होती. पैकी कारखान्यांनी १३ हजार ५९६ कोटी किंमत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अदा केली. अजून २६ कारखान्यांकडे १९३ कोटी रुपये बाकी आहेत. विशेष म्हणजे ऊसदर नियंत्रण आदेश १६६ नियमानुसार ताेड केल्यानंतर १४ दिवसांत उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अदा करणे बंधनकारक आहे. आता पुढचा हंगाम आला तरी राज्याच्या सहकार विभागाने एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केलेली नाही.

फडणवीस सरकारच्या काळातील वसुलीही बाकी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी न मिळाल्याचा प्रश्न फडणवीस सरकारमध्ये सहकारमंत्री असलेले सुभाष देशमुख यांनी अतारांकित प्रश्नात संपलेल्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. आश्चर्य म्हणजे फडणवीस सरकारमधील देशमुख यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील १२७ कोटी रुपयांची एफआरपी अजून वसूल झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...