आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 245 कोटी रुपये जमा, मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • विषाणुविरुध्द लढतांना आपली एकजुट, सहकार्याचे हात आणि मोलाची साथ मला अपेक्षित

कोरोना विषाणुविरुद्धच्या लढ्यात आता महाराष्ट्रातील जनता शासनासोबत सहभागी होत असून मदतीचे शेकडो हात पुढे येत आहेत त्याचाच परिणाम म्हणून आजपर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २४५ कोटी रुपये जमा झाले आहेत.

कोराना विषाणुविरुध्द लढतांना आपली एकजुट, सहकार्याचे हात आणि मोलाची साथ मला अपेक्षित आहे अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. याच भावनेला राज्यातील दानशूर जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आणि या विषाणुविरुद्ध लढण्याची तयारी दाखवली. ज्यांना जी जी मदत करणे शक्य होते त्यांनी त्या मदतीसाठी हात पुढे केले. मदतीचे धनादेश, वस्तु, अन्नधान्याचा पुरवठा, गोरगरीब-अडकून पडलेल्या जनतेच्या जेवणाची व्यवस्था अशा नानाविध स्वरूपातून मदतीचे हे हात पुढे येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.

कोरोना विषाणु विरुद्ध लढतांना मदत करण्यासाठी  मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ हे स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून त्याचा बचतखाते क्रमांक 39239591720  आहे.  

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720 State Bank of India, Mumbai Main Branch,  Fort Mumbai 400023 Branch Code 00300 IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19 बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023 शाखा कोड 00300 आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या  80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.  या खात्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केले आहे.

बातम्या आणखी आहेत...