आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचलुचपतची कारवाई:आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या घरात सापडले 3.5 कोटी रुपये, 50 हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर आला एसीबीच्या जाळ्यात

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाने केली अटक

घराच्या दुरुस्तीचा परवाना देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले आरे वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथु राठोड यांच्या घरात आता 3.5 कोटी कॅश सापडली असल्याची माहिती लाचलुचपत विभागाने दिली आहे. मुख्य म्हणजे ही कॅश कचऱ्यात लपवून ठेवली होती. लाच घेताना अटक केल्यानंतर नथु राठोड यांच्या घरावर लाचलुचपत विभागाने धाड टाकली आणि ही कॅश ताब्यात घेतली.

गोरेगाव पूर्व येथील आरे वसाहतीत राहणारे तक्रारदार यांच्या घराच्या दुरुस्तीसाठी परवानगी मिळावी म्हणून आरे वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांची भेट घेतली होती. दरम्यान नथू राठोड यांनी तक्रारदार यांना शिपाई अरविंद तिवारी यांची भेट घेण्यास सांगितले होते. तक्रारदार यांनी शिपाई तिवारी याची भेट घेतली असता त्याने या कामासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अरविंद तिवारी याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

शिपाई अरविंद तिवारी यांच्या चौकशीत लाचेची रक्कम आरे वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या सांगण्यावरून घेण्यात आल्याचे स्पष्ट होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी नथू राठोड आणि अरविंद तिवारी या दोघांविरुद्ध भ्रष्ट्राचार प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मंगळावारी नथू राठोड यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात 3 कोटी 46 लाख 10 हजार रुपयांची रोकड मिळून आली. याबाबत रोकडबाबत चौकशी करण्यात आली असता नथू राठोड यांच्या घरातील सर्व रोकड बेहिशेबी असल्याचे समोर आले आले.

बातम्या आणखी आहेत...