आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:520 कोटी रुपयांचा घोटाळा; आमदार गुट्टेंच्या मुलास अटक

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगाखेडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार व मराठवाड्यातील प्रख्यात साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा सुनील गुट्टेला अटक करण्यात आली आहे. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी गुरुवारी ही अटक झाली आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनायाने (डीजीजीआय) ही कारवाई केली असून वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बोगस पावत्यांच्या आधारावर ५२० कोटी रुपये आयटीसी मिळवल्याचा आरोप सुनील गुट्टे यांच्यावर आहे.

सुनील गुट्टेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनील गुट्टे हे हायटेक इंजिनीअरिंग लिमिटेडचे संचालक आहेत. कागदपत्रांची अफरातफर करुन बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आयटीसी मिळवल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडने अंदाजे तीन हजार कोटी रुपयांच्या बनावट पावत्या दिल्या आणि घेतल्या. यात ५२० कोटींचा आयटीसी समाविष्ट आहे. या बोगस बिलांचे जाळे नवी दिल्ली, हैदराबाद, लुधियाना, गुरुग्राम, मीरत, अहमदाबाद आणि कोलकातापर्यंत पसरले आहे. देशभरात बनावट पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतल्याप्रकरणी सुनील हायटेक इंजिनीअर्स लिमिटेडची मुख्य भूमिका आहे. सुनील हायटेक इंजिनीअर्स लिमिटेड ही संपूर्ण भारतात बनावट आयटीसी कार्टेलमध्ये सहभागी प्रमुख घोटाळेबाज कंपन्यापैकी एक असल्याचे जीएसटी विभागाने म्हटले आहे. सुनील गुट्टेशिवाय डीजीजीआयने ओशिया फेरो एलॉय प्रायव्हेट लिमिटेडच्या विजेंद्र विजयराज रांका यांनाही अटक केली आहे. या कंपनीवरही बोगस व्यवहाराचा आरोप आहे. वस्तूंचा संपूर्ण पुरवठा न करताच १३७१ कोटी रुपयांच्या बिलांची देवाणघेवाण करण्यात आली. त्यात २०९ कोटींच्या आयटीसीच्या लाभाचा समावेश आहे. गुट्टे आणि रांका या दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...