आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

धारावी कोरोना:आरएसएस आणि इतर संस्थांमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण, यात महाराष्ट्र सरकारचे काहीही योगदान नाही : नितेश राणेंचा दावा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डब्लूएचओने राज्य सरकारला धारावीतील कोरोना नियंत्रणाचे श्रेय देऊ नये - नितीश राणे

मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. मात्र धारावीतील कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्र सरकारमुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघट (आरएसएस) आणि इतर संस्थांच्या कामामुळे नियंत्रणात आली, असा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला. यामुळे डब्लूएचओने राज्य सरकारला याचे श्रेय देऊ नये, असंही नितेश राणे म्हणाले. 

धारावी कोरोना रुग्ण घटण्याचे एकमेव कारण म्हणजे आरएसएस आणि अन्य संस्था आहेत. आरएसएस आणि अन्य समाजसेवी संघटनांनी धारावीत दिवसरात्र मेहनतर करुन मदत केली, तिथल्या लोकांची जनजागृती केली. यात महाराष्ट्र सरकारचे कसंलही योगदान नाही. डब्लूएचओने उगाचचं याचं श्रेय महाराष्ट्र सरकारला देण्यापेक्षा ज्यांनी मेहनत केली त्यांना दिले असते तर समाधान वाटले असते, असं नितेश राणे म्हणाले.

डब्लूएचओकडून धारावीची दखल 

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाविरुद्ध झालेल्या यशस्वी लढ्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कौतुक केले आहे. धारावीने कोरोनावर केलेली मात हे इतरांसाठी आदर्श उदाहरण आहे असेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

डब्ल्यूएचओ चीफनुसार, कम्युनिटी एंगेजमेंट, टेस्टिंग, ट्रेसिंग, आयसोलेटिंग आणि सर्व कोरोनाबाधितांच्या उपचारांवर लक्ष केंद्रित केल्यास कोरोनाची साखळी तोडणे आणि संक्रमण थांबवणे शक्य आहे. प्रत्येक देशाच्या काही मर्यादा आहेत. ज्या ठिकाणी शिथिलता देण्यात येत आहे तेथे संक्रमण वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वानी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास फायदा होऊ शकतो.

धारावीत परिस्थिती अतिशय वाईट होती. धारावीत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2359 आहे. त्यातील केवळ 166 सक्रीय रुग्ण आहे. घनदाट वस्ती आणि बारीक गल्ल्या इत्यादीतून सोशल डिस्टन्सिंग अशक्य वाटत होती. तरीही धारावीत कोणत्या पद्धतीने कोरोनावर मात करण्यात आली

0