आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयात बॉम्बची अफवा:मोबदला न मिळाल्याच्या नैराश्यातून शेतकऱ्याने केला बॉम्ब ठेवल्याचा फोन, घटनास्थळावर पोहोचले होते डॉग स्क्वाड आणि BDS चे पथक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार पोलिस नियंत्रण कक्षाला फोनवरून ही माहिती मिळाली.

वेकोलिमध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला १९९७ पासून न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून शेतकऱ्याने थेट मंत्रालयात बाॅम्ब ठेवल्याचा फोन केला. यामुळे खळबळ माजून मंत्रालयाची सुरक्षा वाढवण्यात आली. तपासाची चक्रे वेगाने फिरवित उमरेड पोलिसांनी या शेतकऱ्याला ठाण्यात बोलावून त्याची चौकशी केली. सागर काशीनाथ मेंदरे हे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला एटीएसने पकडून उमरेड पोलिसांच्या हवाली केल्याची चर्चा होती. या संदर्भात ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी संपर्क साधला असता एटीएसचा याच्याशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मुंबई पोलिसांनी उमरेड पोलिसांना कळवल्यानंतर मेंदरेला उमरेड पोलिसांनी ठाण्यात बोलावून चौकशी केली, असे ओला यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथील शेतकरी सागर मेंदरे यांची जमीन १९९७ मध्ये वेकोलिने अधिग्रहीत केली होती. या जमिनीचा मोबदला त्याला मिळाला नाही. १९९७ पासून ते पत्रव्यवहार करीत आहे. यातून आलेल्या नैराश्यातून त्याने फोन केल्याचे सांगितले जाते. मेंदरे याने यापूर्वीही अशाच प्रकारे फोन केला होता. त्यावेळीही उमरेड पोलिसांनी त्याची चौकशी केली होती.

राज्याचे मुख्य प्रशासकीय केंद्र म्हणजे मंत्रालयात रविवारी बॉम्ब सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर डॉग स्क्वायड आणि BDSचे पथक तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. रविवारी असल्याने केवळ मोजकेच लोक यावेळी उपस्थित होते. पोलिसांना अद्याप बॉम्बचे स्थान सापडलेले नाही, परंतु कोणीतरी फोन करून बॉम्ब ठेवण्याची माहिती दिली होती असे बोलले जात आहे.

मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार पोलिस नियंत्रण कक्षाला फोनवरून ही माहिती मिळाली होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये कॉल आला होता. मंत्रालयाच्या तिन्ही इमारतींमध्ये शोध मोहीम करण्यात आली होती. फोन कॉलनंतर मंत्रालयाच्या आवारात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि अन्य एजन्सीचे प्रमुख अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आमदार वसतिगृहातील बॉम्बबद्दल बनावट माहिती सापडली होती यापूर्वी 29 सप्टेंबर, 2020 रोजी दक्षिण मुंबईतील राज्य सचिवालयाजवळील आकाशवाणी आमदार वसतिगृहामध्ये बॉम्ब ठेवल्यानंतर वसतिगृहात राहणाऱ्या सुमारे 150 लोकांना बाहेर काढण्यात आले होते. मात्र, तपासणीनंतर कोणत्याही प्रकारचे स्फोटक सापडले नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एका कॉलच्या माध्यमातून बॉम्ब असल्याची सूचना मिळाली होती, मात्र हा कॉल खोटा असल्याची माहिती नंतर मिळाली.

बातम्या आणखी आहेत...