आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपुले मरण पाहिले म्या डोळा..!:मुंबईत धावती कार पेटली, वाहनचालक, महिला बालंबाल बचावले; बीए रोडवरील दुळभुळे पुलावर घटना

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपुले मरण पाहिले म्या डोळा.. असाच अनुभव एका महिलेला आणि त्यांच्या वाहनचालकाला मुंबईत आला. धावत्या कारने अचानक पेट घेतला, पण त्यापूर्वीच गाडीतून धुर आल्याचे दिसल्याने महिलेने तत्काळ गाडी थांबवली अन् बाहेर गेली, तोपर्यंत गाडीने मोठा पेट घेतला. यात गाडी पूर्णतः जळून खाक झाली असून महिला या घटनेत बालंबाल बचावली. ही घटना आज बीए रोडवरील दुळभुळे पुलावरून जाताना दुपारी 4.45 वाजता घडली.

मलबार हिल्सला जाताना घटना

आज बीए रोडवरून दुळभुळे पुलावरून अवंती मिर्झा आणि त्यांच्या कारचा चालक शिवबहादूर हे ठाण्याहून मलबार हिल्सला परतत होते. याच ठिकाणी अवंतिका या राहतात.

दुळभुळे रस्त्यावरून जात असताना मध्यभागी अचानक गाडीतून धूर येऊ लागला. त्यामुळे जागीच चालकाने कार थांबवून तिच्या मालकाला कारमधून उतरण्यास सांगितले आणि तोही बाहेर पडला. काही सेकंदातच गाडीला आग लागली.

मुंबईत पेटलेली कार
मुंबईत पेटलेली कार

माटुंगा पोलिस घटनास्थळी

कारमधील महिला घटनेची माहिती देताना.
कारमधील महिला घटनेची माहिती देताना.

घटनेनंतर अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. ते आग आटोक्यात असताना कार जळून राख झाली होती. या घटनेनंतर रस्त्यावर 30 मिनिटे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.

पेटलेल्या कारची आग आटोक्यात आणताना अग्निशामक दलाचे जवान.
पेटलेल्या कारची आग आटोक्यात आणताना अग्निशामक दलाचे जवान.
बातम्या आणखी आहेत...