आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही आठवड्यांत देशात अनेक आर्थिक घडामोडी घडल्या. सरकारने गव्हाची निर्यात थांबवली. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला. महागाई दर वाढला. मागणी घटली, बोरोजगारी दर वाढला आणि तेलातून झालेल्या नफ्यावर सरकारची नाकेबंदी झाली. सरकारने अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याचा दावा केला. देशातील संकट कोरोना व युक्रेन-रशिया युद्धामुळे आहे. दोन्ही पक्षांतील दाव्यांवर इन्व्हॉयरी प्लॅटफॉर्मच्या शोमा चौधरी यांनी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांच्या अॅडव्हायझरी कौन्सिलचे सदस्य नीलकंठ मिश्रांशी वार्तालाप केला. त्याचा हा सारांश...
महागाई वाढली... सरकारने पावले उचलली नाहीत?:
मागणी अधिक आणि पुरवठा कमी झाला तरच महागाई वाढते. कोरोनामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा मोठया प्रमाणात बाधित झाला होता.दरम्यान सरकारने कोणीही उपाशी राहणार नाही, असे ठरवले. आरोग्य सेवांवरही सढळ खर्च केला. अमेरिकेने लोकांना मदत पॅकेज दिले. परंतु ते खूप अधिक होते आणि श्रीमंतांपर्यंतही पोहोचले. भारतात आता इंडस्ट्री सुरू झाली आहे. नोकऱ्या मिळत आहेत. त्यामुळे महागाई कायम राहील, असे कोणतेच कारण नाही. देशाचे पॉलिसी मेकर मदतीसाठी किती मोठे पॅकेज द्यायचे, यावर विचार करत असतानाच लॉकडाऊन उघडले. अर्थव्यवस्थेवर कायम डाग लागला नाही.
रुपया घसरत आहे...?: हा चांगला पर्याय नाही. परंतु कोणते चांगले पर्यायही उपलब्ध नाहीत. असे गृहित धरा देश एक घर आहे. आपल्याला १२० रुपयांचा उपभोग घ्यायचा आहे. आमच्याकडे १०० रुपयेच आहेत. अशावेळी २० रुपये कुठून तरी आणावे लागतील किंवा वापर थांबवावा लागेल. तेव्हा तुम्ही सर्वात महाग वस्तूचाच वापर कमी कराल, जी देशासाठी ऊर्जा आहे. आता याचे दोन पर्याय आहेत. पहिला तुम्हाला त्याची आयात थांबवावी लागेल. यावरील सर्वात चांगला उपाय म्हणजे रुपया कमकुवत होऊ देणे. जोपर्यंत आयात केलेले अॅवोकेडो, ब्लुबेरी, २ लाख रुपयांचे आयफोन महाग होत नाहीत, तोपर्यंत मागणी घटणार नाही. दुसरा एक पर्याय म्हणजे सर्व अर्थव्यवस्थेलाच मंद करावे. ती जास्त व्याज दराने होईल. मी नेहमी अंदाज बांधत असतो की रुपया घसरेल तेव्हा महागाई वाढेल. त्यामुळे रुपया घसरणे चांगली गोष्ट नाही. परंतु विद्यमान परिस्थितीत हा उत्तम उपाय आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.