आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांचे मोदी सरकारवर टीकास्त्र:रशियाने तिकडे लस काढली अन् भारतातील राजकारणी आजही अमेरिकेच्या प्रेमात पागल झालेय, संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंदुस्थान कोरोनाविरोधात ‘भाभीजी पापड’ लाटत बसला आणि तिकडे रशियाने कोरोनावर ‘लस’ बनवून बाजारात आणली

देशभरातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. याच काळात रशियाने कोरोनावर लस काढली आहे. मात्र भारतात अजूनही लसची निर्मिती झालेली नाही. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामधून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भारतातील राजकारणी हे आजही अमेरिकेच्या प्रेमात पागल झालेय म्हणत त्यांनी मोदी सरकारमधील राज्यकर्त्यांना टोला लगावला आहे.

हिंदुस्थान कोरोनाविरोधात ‘भाभीजी पापड’ लाटत बसला आणि तिकडे रशियाने कोरोनावर ‘लस’ बनवून बाजारात आणली. जागतिक आरोग्य संघटनेलाही त्याबाबत विचारले नाही. याला म्हणतात महासत्ता! आम्ही आमच्या मस्तीत आहोत, राष्ट्रातील संकटकाळात आम्हीच आमचे निर्णय घेऊ, जगाने नाक खुपसू नये असे बेदरकारपणे वागणाऱ्य़ा रशियाचा आदर्श आमचे राजकारणी ठेवणार नाहीत. आजही ते अमेरिकेच्या प्रेमात पागल झाले आहेत. असे म्हणत राऊतांनी भाजप नेत्यांना टोला लगावला.

आपण आत्मनिर्भरतेवर प्रवचनेच झोडत बसलो

संजय राऊत रशियाने काढलेल्या लसीला समर्थन देत म्हणाले की, रशियाने बनवलेली ‘लस’ बेकायदेशीर ठरवण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू झाले आहेत, पण रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ही लस सर्वप्रथम आपल्या तरुण मुलींनाच टोचली व आपल्या देशात आत्मविश्वास निर्माण केला. आत्मनिर्भरतेचा हा पहिला धडा रशियाने घालून दिला. आपण आत्मनिर्भरतेवर प्रवचनेच झोडत बसलो आहोत. असा टोलाही राऊतांनी मोदींना लगावला आहे.

देशातील लाखो गोरगरीबांना वाली कोण?
दिल्लीच्या मुक्कामात रशियाच्या लस प्रकरणावर चर्चा झाली तेव्हा एका सरकारी अधिकाऱ्य़ाने मिश्कील भाष्य केले, “हीच लस अमेरिकेत सर्वप्रथम बनली असती तर प्रे. ट्रम्प यांचे काय कौतुक आपण केले असते! आज ज्या मंत्र्यांना व बड्या अधिकाऱ्य़ांना कोरोना झाला आहे, त्यांनी रशियाची लस गुप्त मार्गाने आधीच आणली असेल, पण देशातील लाखो गोरगरीबांना वाली कोण?’’ हा प्रश्न अनुत्तरित आहे. अस म्हणत संजय राऊतांनी भाजपवर सवाल उपस्थित केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...