आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’, त्यांना 106 हुतात्म्यांचे तळतळाट लागतील, शिवसेनेचा भाजपला टोला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना राज्याची 11 कोटी जनताही माफ करणार नाही!
  • शिवरायांच्या महाराष्ट्रावर नशेच्या पिचकाऱया टाकणाऱया व्यक्तीला केंद्र सरकार विशेष सुरक्षेच्या पालखीचा मान देत आहे

अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईचा अवमान केल्यानंतर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान भाजपकडून कंगनाला सुरक्षा पुरवली जात आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनीही पावसाळी अधिवेशनात कंगना आणि अर्णब गोस्वामी यांच्यावरील हक्कभंगाच्या प्रस्तावाला विरोध केला होता. दरम्यान आता सामना अग्रलेखातून मुंबईचा अवमान आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून शिवसेनेने विरोधकांवर निशाणा साधला आहे.

राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना 106 हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची 11 कोटी जनताही माफ करणार नाही! ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा! असे म्हणत सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपला सुनावले आहे.

अग्रलेखात नेमके काय?

  • मुंबई कुणाची? हा प्रश्नच कुणी विचारू नये. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहेच, पण देशाचे सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्रसुद्धा आहे. याच मुंबईसाठी 106 मराठी माणसांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती हिंदुस्थानची आहे, पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती हिंदुस्थानची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना ‘पाकव्याप्त’ कश्मीरशी करणे व मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.
  • महाराष्ट्रातील 11 कोटी मऱ्हाटी जनतेस तर हा असा मुंबईचा अवमान म्हणजे देशद्रोहासारखा गुन्हा वाटतो, पण असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या मागे राष्ट्रभक्त मोदी सरकारचे गृहमंत्रालय सुरक्षा कवच घेऊन ठामपणे उभे राहते तेव्हा आपले 106 हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील.
  • महाराष्ट्र हा सत्यवादी हरिश्चंद्राचा पूजक आहे. मऱहाटी जनांशी बेइमानी करणाऱया विकृतांशी मराठी माणूस सतत लढत राहिला. कोणीही यावे आणि महाराष्ट्राच्या मऱ्हाटी राजधानीवर टपली मारावी, कोणीही ऐऱ्यागैऱ्याने उठावे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून आव्हानाची भाषा करावी या विरोधात संपूर्ण महाराष्ट्राने एकवटायला हवे.
  • महाराष्ट्र संतापलेलाच आहे, पण भारतीय जनता पक्ष मुंबईचा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्यांना सरळ पाठिंबा देत आहे.
  • हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा, धर्माचा आणि 106 हुतात्म्यांच्या त्यागाचाच अवमान केला व असा अवमान करून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर नशेच्या पिचकाऱया टाकणाऱया व्यक्तीला केंद्र सरकार विशेष सुरक्षेच्या पालखीचा मान देत आहे.
  • देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री शहा यांचा ‘एकेरी’ नावाने उद्धार करणाऱ्या टिनपाट वृत्तवाहिनीच्या मालकास भाजपवाल्यांनी असा पाठिंबा दिला असता काय?
बातम्या आणखी आहेत...