आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्यांची राऊतांविरोधात तक्रार:राज्यसभा निवडणुकीत आमदारांना धमकावल्याचा आरोप; निवडणूक रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे तक्रार केली. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी राऊत यांनी अपक्ष आमदारांना धमकावले, आमदारांचे गुप्त मतदान जाहीर करत नियमभंग केला, त्यामुळे राऊतांवर कारवाई करत त्यांची निवडणूक रद्द करावी, अशी मागणी सोमय्या यांनी आयोगाकडे केली आहे. ही तक्रार करण्यासाठी सोमय्या आज स्वत: दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले होते.

सोमय्यांच्या तक्रार अर्जातील मुद्दे

  1. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी संपल्यानंतर पुढील 48 तासांत संजय राऊत यांनी अनेक आक्षेपार्ह विधाने केली.
  2. राऊत म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत अनेक आमदारांनी संजय राऊत, शिवसेनेला मतदान करण्याचे वचन दिले होते. त्यांनी ते वचन पाळले नाही.
  3. शिवसेना, महाविकास आघाडीला कोणी मतदान केले नाही, अशा विश्वासघातकी आमदारांनी नावे आपल्याला माहित असल्याचे वक्तव्य राऊतांनी केले. नियमानुसार, अपक्ष आमदारांचे मतदान गुप्त असते. तरीही संजय राऊतांना त्या आमदारांनी कोणाला मते दिली, हे कसे कळले?
  4. शिवसेना, मविआला मतदान न करणाऱ्या आमदारांवर ठाकरे सरकार कठोर कारवाई करेल, अशी धमकी संजय राऊत यांनी दिली.
  5. भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर केला. भाजपने गृह मंत्रालय आणि गृहमंत्री अमित शहा यांचा वापर केला, असा आरोप करत संजय राऊतांनी निवडणूक आयोगाचाही अपमान केला. तसेच, आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचा भंग केला.
  6. वरील सर्व कारणांमुळे संजय राऊत यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करून, त्यांची निवडणूक रद्द करावी.
बातम्या आणखी आहेत...