आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवाच करायची तर गांधी सप्ताह संयुक्तिक असता:'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवड्यावरुन सचिन सावंताची भाजपवर टीका

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवडा नाही तर सरकारने 'सत्ता पंधरवडा' नाव द्यावे, अशा प्रकारे गांधींशी संबंध जोडणे म्हणजे महात्म्याचे कार्य कमी लेखणे होय, असे म्हणत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. यावरुन काँग्रेसकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे.

सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, सेवाच करायची तर गांधी सप्ताह सयुक्तिक असता. वाढदिवस साजरा करण्यासाठी 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा' नावाने गांधींशी संबंध जोडणे म्हणजे महात्म्याचे कार्य कमी लेखणे होय! गांधीजींचे विचार व कार्य विरुद्ध टोकाचे होते. त्यापेक्षा राज्य सरकारने सत्ता पंधरवडा नाव द्यावे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये सावंतानी मराठवाडा मुक्ती संग्रामावरुन भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले की, 17 सप्टेंबर पासून मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. वाढदिवसाच्या जल्लोषात राज्य सरकारला याचा विसर पडणे यापेक्षा मराठवाड्यावर मोठा अन्याय असू शकत नाही. मराठवाडा मुक्तीसाठी झालेला संघर्ष व त्याग आठवणे, मराठवाड्याच्या प्रगतीचा निग्रह या वर्षात अभिप्रेत आहे.

सचिन सावंत यांचे ट्विट
सचिन सावंत यांचे ट्विट

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे.ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...