आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकच्या पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार शुभांगी पाटील काल चांगल्याच भावनिक झाल्या होत्या. झाशीच्या राणीसारखे लढायचे होते. या त्यांच्या विधानावरुन भाजप आणि काँग्रेस आपापसात भिडल्याचे पाहायला मिळत आहे. अतुल भातखळकर-सचिन सावंत यांच्यात ट्विट वॉर रंगले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा दारुण पराभव झाला. पराभवानंतर मला झाशीच्या राणीसारखे लढायचे होते, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली होती. शुभांगी पाटील यांच्या या प्रतिक्रियेवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली. त्यानंतर काँग्रेसचे सचिन सावंत पाटील यांच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत.
काय म्हणाल्या होत्या पाटील?
झाशीची राणी शेवटच्या श्वासापर्यंत लढली. मी झाशीच्या राणीच्या पायाची धूळही नाही. मात्र झाशीची राणी लढली तसे मला लढायचे होते. झाशीच्या राणीचा शेवट झाला नाही. त्यांचे नाव इतिहासात अमर झाले. तशीच आपलीही इतिहास दखल घेईल, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार शुभांगी पाटील यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्या भावना अनावर झाल्या.
महाराष्ट्राचा अपमान
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर टीका केली. भातखळकर म्हणाले, 'स्वतःच स्वतःची तुलना राणी लक्ष्मी बाईंशी करणे हा महाराष्ट्राचा अपमान नाही का लाचारांनो?' यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे जशास तसे उत्तर दिले. सचिन सावंत म्हणाले, 'भाजपासाठी कंगना राणावत झाशीची राणी आहे हे राम कदम यांनी स्पष्ट केलेले आहे. नाही का'? से सावंत म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.