आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसचा भाजपवर निशाणा:'सुशांत प्रकरणात एम्सचा रिपोर्ट आल्याने भाजपे तोंड काळे झाले, त्यांचा कट उघडकीस आला'; काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मीडिया रिपोर्टनुसार एम्सच्या डॉक्टरांना व्हिसेरामध्ये कोणत्याही प्रकारचे विष आढळलेले नाही

एम्स डॉक्टरांच्या समितीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा अहवाल सीबीआयकडे सोपवला आहे. मीडिया रिपोर्टनुसार एम्सच्या डॉक्टरांना व्हिसेरामध्ये कोणत्याही प्रकारचे विष आढळलेले नाही. यानंतर आता काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. सुशांत प्रकरणात एम्सचा रिपोर्ट आल्याने भाजपचे तोंड काळे झाले असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

या सर्व प्रकणाविषयी सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, 'सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एम्स रुग्णालयाने जो अहवाल दिला आहे त्यावरुन हे स्पष्ट झालेय की त्याच्या शरीरात विषाचा कोणताही अंश नव्हता. भाजपचा कट उघडकीस आला आहे. तसेच गुप्तेश्वर पांडेला व्हीआरएस असाच नाही मिळाली. ज्या घृणास्पद मार्गाने मुंबई पोलिसांची बदनामी झाली, महाराष्ट्राचा अपमान झाला, महाराष्ट्रातील जनता भाजपला माफ करणार नाही'

पुढे सचिन सावंत म्हणाले की, 'राजकीय षडयंत्रांतर्गत तीन एजन्सी महाराष्ट्रात आणल्या गेल्या. सीआरपीसी आणि संघराज्य प्रणालीचा बोजवारा उडवण्यात आला. बिहार पोलिसांनी याचा वापर राजकारणासाठी केला. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना दोष देण्यात आले. मोदी सरकार पुरस्कृत गोदी मिडिया ट्रायलचा आम्ही निषेध करतो. ' असे म्हणत सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची चौकशी करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात एम्सच्या पाच डॉक्टरांची समिती तयार केली गेली. 20 सप्टेंबर रोजी हे पथक आपला अहवाल सादर करणार होते. मात्र याला 8 दिवसांचा उशीर झाला. आता डॉक्टरांच्या टीमचा अभ्यास पूर्ण झाला असून त्यांनी सीबीआयकडे आपला अहवाल सोपवला आहे.

बातम्या आणखी आहेत...