आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ना'राजीनामा:महाराष्ट्र काँग्रेसमधील नवीन बदलामुळे सचिन सावंत नाराज, प्रवक्तेपदाचा दिला राजीनामा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नाना पटोलेंनी विविध समित्यांची फेररचना केली.

राज्यातील काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे एक मोठा धक्का राज्यातील काँग्रेसला बसला आहे. पत्रकार परिषदा, सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवरील चर्चांच्या माध्यमांतून गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस पक्षाची भूमिका मांडणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली यामुळे नाराजी असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची सूत्रांची माहिती आहे.

काँग्रेसमध्ये प्रवक्तेपदाची निवड करण्यात आलेली आहे. मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढेंची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सचिन सावंत नाराज होते आणि यामुळेच त्यांनी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच त्यांनी ट्वीटर अकाऊंटमधूनही पदाचा उल्लेख हटवला आहे.

काँग्रेसमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नाना पटोलेंनी विविध समित्यांची फेररचना केली. असे करत असताना त्यांनी पदाधिकारी बदलले. त्यांनी सचिन सावंत यांचा माध्यम आणि सवाद विभाग समितीमध्ये समावेश केला. मात्र मुख्य प्रवक्तेबदाची जबाबदारी अतुल लोंढेंना देण्यात आली. त्यांना लोंढेंच्या नेतृत्त्वाखाली काम करावे लागणार होते. यामुळे सचिन सावंत नाराज आहेत.

बातम्या आणखी आहेत...