आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिनची बॅट कारागीराला मदत:दिग्गज खेळाडूंच्या बॅट दुरुस्त करणारे अशरफ मुंबईत रुग्णालयात दाखल, सचिन तेंडुलकरने केली आर्थिक मदत

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मधुमेह आणि न्यूमोनियामुळे अशरफ 12 दिवसांपासून मुंबईच्या रूग्णालयात दाखल आहेत

क्रिकेटमध्ये धावा करणारा आणि लांब षटकार मारणारा फलंदाज नेहमीच लक्षात राहतो. मात्र त्या खेळाडूंची बॅट दुरुस्त करणारा कारागीर नेहमीच पडद्यामागे राहतात. असेच मुंबईतील एक व्यक्ती अशरफ चौधरी आहेत. त्यांनी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि ख्रिस गेल यांसारख्या अनेक दिग्गजांच्या बॅट दुरुस्त केल्या आहेत. मात्र सध्या ते 12 दिवसांपासून रुग्णालयात भर्ती आहेत.

क्रिकेट विश्वास अशरफ चौधरी अशरफ चाचा नावाने प्रसिद्ध आहेत. कोरोनामुळे क्रिकटे बंद असल्याने त्यांच्यावर आर्थिक परिस्थिती हालाकिची झाली आहे. अशात सचिन त्यांची मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे.

पोलार्ड आणि स्मिथच्या बॅट देखील दुरुस्त केल्या

अशरफ यांचे जवळचे मित्र प्रशांत जेठमलानी म्हणाले की, "तेंडुलकर मदतीसाठी पुढे आला आणि अशरफ चाचाशी बोलले. सचिनने त्यांना आर्थिक मदत देखील केली आहे." अशरफ चाचा यांचे दक्षिण मुंबईत 'एम अशरफ ब्रो' नावाचे दुकान आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि वेस्टइंडीजचे कॅरोन पोलार्ड यांच्या बॅट देखील दुरुस्त केल्या आहेत.

सामन्या दरम्यान वानखेडे स्टेडियमवर अशरफ नेहमीच उपस्थित असतात

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये जेव्हा भारतीय संघ किंवी आयपीएलचे सामने होतात तेव्हा अशरफ नेहमीच तिथे उपस्थित असतात. असे म्हटले जाते की, ते बर्‍याचदा शुल्क न आकारता खेळाडूंच्या बॅट दुरुस्त करतात.