आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनचा मराठमोळा अंदाज:'मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा…पुण्याला करतोय ये जा' सचिन तेंडूलकरने धरला ठेका, कारमधील व्हिडिओ केला ट्विट्

पूणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडूलकरबद्दल आजही सर्वांना कुतुहल आहे. क्रिकेटमुळे ग्लोबल आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या सचिनचे मराठीपण प्रत्येक मराठी माणसांना शोधायला आवडते. सचिनचा असाच एक मराठमोळा अंदाजही समोर आला आहे. सचिन चक्क मराठीतील प्रसिद्ध गीत मी डोलकं रं..डोलकं रं.. यावर डोलतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे प्रवासातील सततच्या फेऱ्यांमुळे होणारी दमछाक गाण्यातून जुळवताना तो दिसतो.

आजही सचिनचे नाव सर्वांच्या मनावर गारूड घालणारे आहे. आता जरी सचिन क्रिकेट खेळत नसला तरी सध्या सुरू असलेल्या IPL सामन्यात सहभागी मुंबई इंडीयन्स टीमचा मार्गदर्शक आहे. यानिमित्तानेच हा व्हिडिओ समोर आला आहे.

सध्या आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू आहे. यंदाचे आयपीएल सामने मुंबई आणि पुणे या दोन शहरात होत आहे आणि सचिन तेंडूलकर आयपीएलमध्ये सहभागी मुंबई इंडीयन्स संघाच्या मार्गदर्शकाचे काम करीत आहे. त्यामुळे सचिन तेंडूलकरला संघाच्या सामन्याच्या स्थानानुसार पूणे-मुंबई अशा फेऱ्या माराव्या लागत आहेत.

या हंगामात मुंबई इंडीयन्सने दोन सामने हरली. मुंबई इंडीयन्सचा पुढचा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याच कारणामुळे मुंबईच्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी सचिन पुण्याला पोहोचला आहे. मुंबई-पूणे असा वारंवार प्रवास करावा लागत असल्याने सचिन त्याच्या कारने प्रवास करीत आहे.

कारने पुण्याला जाताना सचिनने एक व्हिडिओ ट्विट केले आहे. यात सचिनचे मराठी गीतांबद्दल प्रेम उघड झाले आहे. मराठी गीतावर तो अक्षरशः डोलत असून सोबत गीत गुणगणतानाही दिसतो.

सचिनने कारमध्ये ‘मी डलोकर डोलकर डोलकर दर्याचा राजा’ हे मराठीतील अजरामर गीत लावले होते. गीत ऐकताना सचिन आनंदी होऊन गीत गाताना दिसतो आणि मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा… पुण्याला करतोय ये जा…असेही पुटपुटताना दिसतो. या पूर्ण क्षणाचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर अपलोड केला. सचिनच्या या व्हिडीओमुळे सचिनचा मराठमोळा अंदाज समोर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...