आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी वसूलीचे आरोप:माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेला आणखी 7 दिवसांची कोठडी; आता 13 नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेच्या तावडीत

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसुख हिरेन हत्याकांड आणि 100 कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप सचिन वाझेची पोलिस कोठडी आणखी 7 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. यापूर्वी 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत माजी सहाय्यक पोलिस निरीक्षक वाझेला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने वाझेची 10 दिवस कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने त्याला 6 नोव्हेंबर पर्यंतची कोठडी दिली होती.

आता शनिवारी त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले आणि कोर्टाने त्याला आणखी 7 दिवस क्राइम ब्रांचच्या हवाली केले आहे. 49 वर्षीय सचिन वाझेला उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही ठेवण्याचे षडयंत्र आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात त्याला मुंबई पोलिस दलातून बरखास्त करण्यात आले आहे.

गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये वाझेच्या विरोधात खंडणी मागितल्याचे आरोप सुद्धा आहेत. या प्रकरणात आणखी चौकशी करण्यासाठी त्याच्या कोठडीत वाढ करण्यात यावी अशी विनंती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली होती.

वाझे प्रकरणात झाली अनिल देशमुखांना अटक
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाझे प्रकरणात अटक करण्यात आली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचे आरोप केले होते. त्या प्रकरणी CBI कडून चौकशी सुरूच आहे. पण, अनिल देशमुखांना ED ने एंटीलिया प्रकरणी बरखास्त सचिन वाझे प्रकरणात अटक केली आहे. सचिन वाझेच्या माध्यमातून 4.7 कोटी रुपयांची वसूली केल्याचे आरोप आहेत. हा पैसा सचिन वाझेने मुंबईतील काही रेस्तरॉ आणि बारमालकांकडून गोळा केला. तसेच कथितरित्या देशमुख यांचे स्वीय्य सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना दिले होते. या दोघांना ईडीने यापूर्वीच अटक केली.

बातम्या आणखी आहेत...