आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sachin Vaze Antellia Case Update: Mukesh Ambani Antilia House Case Update | National Investigation Agency (NIA), Mumbai Police Latest News

पोलिस मुख्यालयात रचले षडयंत्र?:स्कॉर्पिओचा कट पोलिस मुख्यालयातून शिजल्याचा NIA ला संशय, मनसुख प्रकरणाचा तपास करणाऱ्या ATS सुद्धा हवा सचिन वाझेंचा ताबा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • NIA ला सापडले वाझेच सूत्रधार असल्याचे सबळ पुरावे!

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणाच्या तपासात शनिवारी नवीन खुलासा झाला आहे. त्यानुसार, स्कॉर्पिओचे कट पोलिस मुख्यालय आणि API सचिन वाझे यांच्या घरात शिजवला असावा असा संशय राष्ट्रीय तपास संस्था NIA ने व्यक्त केला आहे. स्कॉर्पोचा मालक मनसुख हिरेनचा पोलिस मुख्यालयात वावर होता. त्यातच NIA च्या हाती एक व्हिडिओ लागला असून त्यामध्ये मनसुख आणि वाझे एकाच वाहनात बसून जाताना दिसून आले आहेत.

वाझे सूत्रधार असल्याचे पुरावे सापडले!
NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटिलिया स्कॉर्पिओ प्रकरणातील सूत्रधार सचिन वाझेच असल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत. या कारमध्ये स्फोटके भरून ती अंबानींच्या घराजवळ पार्क करण्यात आली होती. यामध्ये जिलेटीनच्या 20 कांड्या सापडल्या होत्या. या स्कॉर्पिओचा एक इनोव्हा कार पाठलाग करत होती. ती इनोव्हा वाझे यांची असून त्या दिवशी ती कार क्राइम इनव्हेस्टिगेशन युनिट (CIU) चा कर्मचारी चालवत होता. सचिन वाझे हे CIU चे प्रमुख होते. त्या दोन्ही कारचे सीसीटीव्ही सुद्धा NIA च्या हाती लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ती स्कॉर्पिओ स्वतः वाझे चालवत होते. त्यानंतर ते इनोव्हा कारमध्ये बसून तेथून निघून गेले.

सबळ पुराव्यांसाठी NIA ने दृश्यांची केली पुनरनिर्मिती
NIA ने शुक्रवारी रात्री उशीरा अँटिलिया पासून काही अंतरावर क्राइम सीन रीक्रिएट केला. NIA च्या टीमने वाझेंना यात पांढरा कुर्ता घालून चालण्यास सांगितले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, घटनेच्या दिवशी एक व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये पीपीई किट घालून चालताना दिसून आली होती. तो सीन रीक्रिएट करण्यासाठी वाझेंना कुर्ता आणि डोक्यावर रुमाल सुद्धा दिला होता. परिसरात सीसीटीव्ही लावून मार्किंग करण्यात आले. एक डमी स्कॉर्पिओ त्या ठिकाणी ठेवण्यात आली. परिसरात बॅरिकेड लावण्यात आले. जेणेकरून मीडियाला सुद्धा तेथे प्रवेश मिळणार नाही. घटनास्थळी फॉरेन्सिक एक्सपर्ट सुद्धा होते.

ATS ला सुद्धा हवा वाझेंचा ताबा
अँटिलिया प्रकरणात निलंबित आणि अटकेत असलेले वाझे यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर महाराष्ट्र ATS ने आपले उत्तर दिले. सोबतच, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करत असताना वाझे यांची कस्टडी हवी अशी मागणी सुद्धा केली. 4 मार्च ते 5 मार्च दरम्यान नेमके काय घडले याचा तपासही ATS कडून केला जात आहे. यात घटनांचा क्रम जोडला जात आहे. 17 ते 25 फेब्रुवारीपर्यंत स्कॉर्पिओ कुठे होती? वाझेंकडे होती का? या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. पण, न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 30 मार्च पर्यंत स्थगित केली आहे.

बातम्या आणखी आहेत...