आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिलिया प्रकरण:मनसुख यांचे पोस्टमार्टम करणारे तीन डॉक्टर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर; शवविच्छेदन दरम्यान वाझे घटनास्थळी उपस्थित असल्याचा पुरावा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोस्टमॉर्टमच्या ठिकाणी मनसुखच्या भावाला भेटला होता वाझे

अँटिलिया प्रकरणामध्ये स्फोटके आढळलेल्या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वेग पकडला आहे. कारण मनसुख यांची हत्या झाल्यानंतर शवविच्छेदनादरम्यान त्या खोलीमध्ये डॉक्टरांसोबत सचिन वाझेदेखील उपस्थित असल्याचा पुरावा एनआयएच्या हाती लागला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत अजून जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. एनआयएकडून आता मनसुख हिरेनचे पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांना चौकशीसाठी बोलवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांना 'या' गोष्टीचे उत्तर द्यावे लागणार

  • शवविच्छेदनादरम्यान त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? पोस्टमार्टमची व्हिडियोग्राफी झाली होती का?
  • डॉक्टरांना भेटायला कोण-कोण लोक आले होते? संभाषणसाठी कोणाचा फोन आला होता का?
  • पोस्ट मॉर्टमचे संपूर्ण नमुने पहिल्याच वेळी फॉरेन्सिकसाठी का पाठवले गेले नाहीत?
  • डॉक्टरांकडून रुग्णालयात येणाऱ्या लोकांचा अवहाल मागितला जाणार? एटीएसच्या तपासणीत असे दिसून आले की भेटलेल्यांची लेखी नोंद नाही.
  • सचिन वाझे पोस्टमार्टम खोलीमध्ये काय करत होता? काय तो अधिकृतपणे तेथे आला, त्याने डॉक्टरांवर कोणताही दबाव टाकला होता का?

पोस्टमॉर्टमच्या ठिकाणी मनसुखच्या भावाला भेटला होता वाझे
एनआयएच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांच्या पोस्टमार्टमवेळी सचिन वाझे हा त्याच्या भावाला भेटल्याचा पुरावा राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या हाती लागला आहे. कारण सचिन वाझे 5 मार्च रोजी संध्याकाळी 6.30 वाजेच्या दरम्यान सरकारी हॉस्पीटलमध्ये आले होते. तेथे त्यांनी गुन्हे शाखा विभागाच्या अलकनूर यांच्याशी संवाद साधला होता. एनआयए आता अलकनूर यांची देखील चौकशी करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...