आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Sachin Vaze Antilia Case: Mukesh Ambani Antilia Security Mansukh Hiren Murder Case Update | National Investigation Agency, Mumabi Police Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशी झाली मनसुखची हत्या:मनसुखला आधी क्लोरोफॉर्मने बेशुद्ध करण्यात आले, मग 4 जणांनी केली हत्या; AUDI मध्ये बसून सर्व पाहत होता सचिन वाझे

मुंबई23 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मनसुख हिरेनची हत्या नेमकी कशी झाली? त्या दिवशी काय घडले?
 • मनसुखची हत्या आपल्या Audi मध्ये बसून पाहत होता सचिन वाझे

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात रोज नव-नवीन खुलासे होत आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तो मालक होता. या घटनेनंतर त्याचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक (ATS) करत आहे. त्यात ATS ने आता या प्रकरणाचा छळा लावल्याचा दावा केला. ATS च्या माहितीप्रमाणे, मनसुखची हत्या करण्यामध्ये 4 जणांचा समावेश आहे. त्यातील तिघे अटकेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाणे सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ला दिलेल्या रिपोर्टमध्ये हा खुलासा करण्यात आला.

मनसुखची हत्या करण्यापूर्वी त्याला बेशुद्ध करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा श्वास रोखून त्याची हत्या करण्यात आली. त्यावेळी घटनास्थळी सचिन वाझे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती एटीएसला तपास करताना मिळाली आहे. एटीएसने घटना घडली त्यावेळी मोबाईल लोकेशन सुद्धा तपासून यासंदर्भात सबळ पुरावे गोळा केले आहेत.

मारल्यानंतर चेहऱ्यावर बांधले होते रुमाल
सूत्रांच्या माहितीनुसार, मनसुखच्या चेहऱ्यावर बांधलेल्या 5 रुमालांमध्ये क्लोरोफॉर्म टाकण्यात आले होते. श्वास रोखून मारल्यानंतरही आरोपींना मनसुखच्या मृत्यूबाबत शंका होती. त्यामुळे, त्यांनी रुमाल बांधून मनसुखला पाण्यात फेकून दिले. विशेष म्हणजे, प्राथमिक तपासातच अधिकाऱ्यांना मनसुखच्या चेहऱ्यावर बांधलेल्या रुमालवरून हत्येचा संशय आला होता.

मनसुख हत्या प्रकरणी ATS चे 10 खुलासे

 1. सचिन वाझेनेच मनसुखला 'तावडे' नावाने व्हॉट्सअॅपवर कॉल करून बोलावले होते. दोघांचे संभाषण मनसुखची पत्नी विमला यांनी ऐकले होते.
 2. मनसुखची हत्या रात्री 10 वाजता करण्यात आली. त्यानंतर रात्री जवळपास 11 वाजता सचिन मुंबईत आला आणि त्याने जवळपास पावणे 12 वाजता डोंगरीच्या टिप्सी बारमध्ये रेड मारण्याचे ढोंग केले. मनसुखची हत्या करण्यात आली त्यावेळी वाझे आपल्या Audi कारमध्ये बसून सर्व पाहत होता.
 3. सीडीआर रिपोर्टनुसार, वाझेने हत्या करण्याच्या दिवशी एकही फोन कॉल केला नाही. त्याने कुणाचाही फोन सुद्धा रिसीव्ह केला नाही. तरीही तो केवळ व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कॉल करत होता.
 4. सचिन वाझेने डोंगरीतील टिप्सी बारमध्ये रेड मारण्याचे ढोंग केले. जेणेकरून मनसुखच्या हत्येचा तपास झाला तर त्याला आपण डोंगरीतील तपासात व्यस्त होतो असे सांगता येईल. टिप्सी बारच्या CCTV मध्ये वाझेने धाड टाकल्याचे पुरावे सापडले.
 5. ठाणेतील घोडबंदर परिसरात आल्यानंकर सचिन वाझे आधी पोलिस मुख्यालयात पोहोचला. त्यानंतर CIU च्या आपल्या कार्यालयात गेला. मग या ठिकाणी आपले मोबाईल चार्जिंगवर लावले. जेणेकरून पोलिस मुख्यालयात असल्याचे लोकेशन मिळेल.
 6. सचिन वाझेने आपला जबाब देताना सांगितले होते की तो 4 मार्च रोजी मुंबई पोलिस मुख्यालयातील CIU कार्यालयात होता. पण, मोबाईलचे लोकेशन दुपारी पावणे एक वाजता चेंबूर येथे दाखवत होते.
 7. मनसुखकडे एक मोबाईल असले तरी त्यामध्ये तो दोन सिमकार्ड वापरत होता. ATS ने त्या दोन्ही नंबरचे सीडीआर काढले. त्यातील एका नंबरवर मनसुखला त्याची पत्नी विमला यांनी रात्री 8 वाजून 32 मिनिटाला कॉल केला होता असे कळाले. तर दुसऱ्या नंबरवर शेवटी 10 वाजून 10 मिनिटाला 4 मेसेज आले होते. त्यावेळी फोन वसई येथील मालजीपाडा परिसरात होता.
 8. याच प्रकरणात अटकेत असलेल्या विनायक शिंदेने सांगितल्याप्रमाणे, तो वाझेंना कॉल करण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या एका सिमकार्डचा वापर करत होता. हे सिमकार्ड त्याने क्रिकेट बुकी नरेश गोरच्या माध्यमातून गुजरातेतून मागवले होते.
 9. उद्योजक सचिन वाझेनेच अंबानींना धमकीचे पत्र लिहिले होते. हा खुलासा विनायक शिंदेच्या घरात काम करणाऱ्या एका पेंटरने केला होता.
 10. वाझेने आपल्या षडयंत्रात मनसुखला सामिल करून घेतले होते. याचे पुरावे ATS आणि NIA ला सुद्धा सापडले. पण, जेव्हा ATS ने सचिन वाझेची चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यातही मनसुख भीतीने सामिल झाला होता की आपल्या मर्जीने हे सुद्धा सिद्ध होऊ शकले नाही. सध्या दोघांमध्ये झालेल्या संवादाचे डिजिटल पुरावे एटीएसकडे आहेत.
बातम्या आणखी आहेत...