आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sachin Vaze Antilia Case: Mukesh Ambani Antilia Security Mansukh Hiren Murder Case Update | National Investigation Agency, Mumabi Police Latest News 26 March 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिलिया प्रकरण:अटक केलेल्या शिंदे-गोरेंना वाझेसमोर बसवून चौकशी करणार NIA, वाझेला दाऊद अँगलने केस भरकटवायची होती

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनसुखच्या हत्येवेळी वाझे घटनास्थळावर असल्याचा पुरावा NIA ला मिळाला आहे

अँटिलिया प्रकरणामध्ये मनसुख हिरेनच्या हत्येचा तपास आता ATS कडून NIA च्या हातात आला आहे. यानंतर NIA चे पथक रात्री उशीरा रेती बंदरच्या खाडीमध्ये मनसुख हिरेन याचा मृतदेह आढळलेल्या ठिकाणी गेले. मनसुखची रात्री हत्या झाली होती, यामुळे पथक निलंबित केलेल्या असिस्टेंट पोलिस इंस्पेक्टर (API) सचिन वाझेंना घेऊन तेथे रात्री गेले आणि पूर्ण सीन रीक्रिएट केला.

ATS ने अटक केलेले माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि सट्टेबाज नरेश गोरे यांना NIA कडे सुपूर्द केले आहे, त्यानंतर केंद्रीय अन्वेषण एजन्सी आज सचिन वाझे आणि दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करू शकते. ज्या कारमध्ये मनसुखची हत्या झाली होती ती कार देखील NIA च्या हाती लागली आहे. कारमधून जप्त केलेल्या फॉरेन्सिक पुराव्यांशी जुळवण्यासाठी वाझेंची डीएनए चाचणी होणार आहे. यासाठी वाझेचे रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहेत.

वाझेला दाऊद अँटलने तपास भरकटवायचा होता
NIA च्या सूत्रांनुसार, सचिन वाझे अँटिलिया प्रकरणाला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडून तपास अधिकाऱ्यांना भरकटवणार होता. त्याने दुबईत राहणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंधित एका मोठ्या व्यक्तीला बनावट टेलिग्राम बनवून धमकी देणारा संदेश पाठवण्यास सांगितले होते. जिलेटिन असलेली स्कॉर्पिओ आढळल्यानंतर 12 दिवसांपर्यंत वाझे या प्रकरणात चौकशीत होता.

खरेतर, या प्रकरणातील धमकी दिल्लीच्या तिहाड कारागृहातून पाठवली गेली. यासाठी जैश-ए-हिंद नावाचे बनावट टेलीग्राम खाते तयार केले गेले. याचा तपास करण्यासाठी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका खासगी सायबर फर्मची मदत घेतली होती, परंतु हे कोठेही रेकॉर्डमध्ये समाविष्ट केलेले नाही. हा संदेश महत्वाचा असूनही मुंबई पोलिस तिहार कारागृहात का गेले नाहीत, याची चौकशी आता NIA करत आहे.

वाझेने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले
NIA कोर्टात न्यायाधीश पीपी सितार यांच्यासमोर वाझेंचे वकील म्हणाले, 'मनसुख हत्येप्रकरणी वाझेचा काही संबंध नाही. त्याला बळीची बकरा बनवण्यात आले आहे.' एनआयएचे वकील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी कोर्टाला सांगितले की गुन्ह्यात कुणी पोलिस सामिल होणे आणि वाझेंच्या घरातून NIA ला मिळालेले 62 काडतुसांच्या तपासाची गरज आहे. एनआयए कोर्टाने दहशतवाद प्रतिबंधक कायदा UAPA च्या कलम 16 आणि 18 अन्वये आरोपींना 3 एप्रिलपर्यंत NIA च्या ताब्यात पाठवले आहे.'

मनसुखच्या हत्येवेळी वाझे घटनास्थळावर असल्याचा पुरावा NIA मिळाला आहे
NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइल टॉवर आणि IP इव्हेल्यूशनच्या आधारे असे आढळून आले आहे की, मनसुखच्या हत्येच्या वेळी वाझे घटनास्थळी हजर होता. नंतर, वाझे मुंबई पोलिस मुख्यालयात असलेल्या CIU कार्यालयात गेला आणि आपला मोबाइल फोन चार्जिंगला लावला, जेणेकरुन लोकेशन तिथे दिसेल. वाझेने सांगितले की 4 मार्च रोजी तो दिवसभर आयुक्त कार्यालयात होता, तर 4 मार्च रोजी रात्री 12:48 वाजता त्याचा मोबाईल लोकेशन चेंबूरच्या MMRDA कॉलनीत होता.

बातम्या आणखी आहेत...