आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sachin Vaze Antilia Case: Mukesh Ambani Antilia Security Mansukh Hiren Murder Case Update | National Investigation Agency, Mumabi Police Latest News| Mystery Women Caught By Nia NIA

अँटिलिया प्रकरणात NIA ला मोठे यश:सचिन वाझेची नीकटवर्तीय मिस्ट्री WOMEN ला पकडले, NIA ला सापडला वाझेचा अड्डा; स्कॉर्पिओ धमकी प्रकरणात अंडरवर्ल्डचा हात असल्याचा संशय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काळा पैसा पांढरा करण्यासाठी काम करत होती मीना

अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनआयएकडून गेल्या 15 दिवसांपासून मिस्ट्री वीमेनचा तपास सुरू होता. अखेर रात्री उशीरा या मिस्ट्री वीमेनचा शोध लागला आहे. या महिलेची ओळख मीना जॉर्ज म्हणून झाली आहे. मीना एक नोट काउंटिंग मशीनसोबत सचिन वाझेला भेटण्यासाठी दक्षिण मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये आली होती. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मीनाचा चेहरा कैद झाला होता. या प्रकरणात NIA ला माहिती मिळाली आहे की, स्कॉर्पिओ प्रकरणात ज्या धमक्या दिल्या गेल्या होत्या, त्याचे कनेक्शन अंडरवर्ल्डशी आहे.

काळा पैसा पांढरा करण्यासाठी काम करत होती मीना
मिळालेल्या माहितीनुसार, मीनाला ठाणे जिल्ह्यातील मीरारोड भागात फ्लॅटमधून पकडले गेले. येथे ती भाड्याने राहत होती. हा फ्लॅट पियुष गर्ग नावाच्या व्यक्तीचा आहे. एनआयएला संशय आहे की मीना सचिन वाझेच्या काळ्या पैशांना पांढरे करण्यासाठी मदत करत होती. एनआयएने मीनाच्या फ्लॅटचीही झडती घेतली आणि मीनाची चौकशी केली आणि येथून बरीच कागदपत्रे हस्तगत केली. रात्री उशिरा तिला एनआयएच्या कार्यालयात नेण्यात आले.

एनआयएची टीम मीनाच्या घरी छापेमारीसाठी गेली तेव्हाचा हा फोटो आहे.
एनआयएची टीम मीनाच्या घरी छापेमारीसाठी गेली तेव्हाचा हा फोटो आहे.

बनावट सिमकार्डसाठी वापरलेली कागदपत्रेही जप्त केली आहेत
तर रेस्टॉरंटमध्ये छापा टाकताना एनआयएने बनावट नावे सिमकार्ड मिळवण्यासाठी वापरलेली कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणात रेस्टॉरंट मॅनेजर संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

मीना मुंबईच्या याच 7/11 अपार्टमेंटमध्ये लपून राहत होती.
मीना मुंबईच्या याच 7/11 अपार्टमेंटमध्ये लपून राहत होती.

NIA ने घेतला सचिन वाझेच्या अड्ड्याचा शोध
दक्षिण मुंबईतील गिरगाव भागातल्या एका रेस्टॉरंटमध्येही राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) छापा टाकला आहे. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे रेस्टॉरंट सचिन वझेचा अड्डा होता आणि तो या ठिकाणाहून आपल्या योजना आखत होता. 25 च्या पहिल्याच्या 45 दिवसांपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंटच्या मालक आणि कर्मचाऱ्यांचीही विचारपूस केली आणि वाझेने येथे कोणकोणत्या लोकांबरोबर बैठक केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

वांद्रे वरळी सी लिंक येथून घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाझे आणि विनायक शिंदे दिसत आहेत.
वांद्रे वरळी सी लिंक येथून घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाझे आणि विनायक शिंदे दिसत आहेत.

दोन सीसीटीव्ही फुटेजही एनआयएच्या हाती लागले
एनआयएकडे वसई परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आले आहेत. यामध्ये वाझे प्रकरणात अटक केलेला अजून एक आरोपी विनायक शिंदेसोबत दिसत आहे. याशिवाय एनआयएला वरळी सी लिंकचा सीसीटीव्ही व्हिडिओही मिळाला आहे. यामध्ये वाझे आणि शिंदे ऑडी कारमध्ये दिसले आहेत. या कारमध्येच मनसुखचा खून झाल्याचा एनआयएला संशय आहे. बुधवारी ताब्यात घेतलेल्या या कारची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. सचिन वाझेच्या नावावर ही कार रजिस्टर्ड होती. हिरेनची हत्या करण्यापूर्वी वाझेने या कारचा वापर केल्याचा एनआयएला संशय आहे. तपास यंत्रणेने आतापर्यंत एकूण आठ वाहने जप्त केली आहेत. एनआयए सध्या या प्रकरणात स्कोडा कार शोधत आहे.

अंडरवर्ल्डमधील एका गुंडाच्या सांगण्यावरून धमकी पाठवली गेली
25 फेब्रुवारीला अँटिलिया बाहेर पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारची जबाबदारी स्वीकारण्याशी संबंधित संदेश पोस्ट करण्यात आला होता. त्यामध्ये अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे समोर आहे. 'जैश-उल-हिंद' नावाच्या संस्थेने जबाबदारी स्वीकारली, पण नंतर उघडकीस आले की तिहार कारागृहात बंदी असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या तहसीन अख्तरने टेलिग्राम चॅनलद्वारे धमकी देणारा संदेश पाठवला होता. एनआयएला पुरावा मिळाला आहे की, धमकीयुक्त संदेश पोस्ट करण्यासाठी वसईमधून अंडरवर्ल्डच्या एका गुंडाच्या माध्यमातून तुरुंगात संदेश पाठवण्यात आला होता. तो मुंबईच्या चर्चित 'जेजे शूटआउट' मध्ये दोषी आहे. सध्या तो एका रुग्णालयात उपचार घेत आहे. एनआयए लवकरच त्याचीही चौकशी करु शकते.

बातम्या आणखी आहेत...